तोंडावर एक माग एक अशी भूमिका मला चालणार नाही,काय ते स्पष्ट सांगा,अजित दादांचे कार्यकर्त्यांना खडे बोल!


प्रशासक न्यूज,दि.२६एप्रिल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्या प्रचारात सक्रिय होण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार गट)कार्यकर्त्यांची संवाद बैठक आज सकाळी दहा वाजता दौंड शुगर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती

या बैठकीसाठी राजेंद्र नागवडे,सौ अनुराधा नागवडे,बाळासाहेब नाहाटा,दत्तात्रय पानसरे,आदेशशेठ नागवडे यांच्यासह नागवडे कारखान्याचे सर्व संचालक,नागवडे यांना मानणारे विविध संस्थांचे पदाधिकारी,राष्ट्रवादी चे श्रीगोंदा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

डॉ सुजय विखे यांच्या प्रचारात सक्रिय नसलेल्या कार्यकर्त्यांची यादीच यावेळी अजित पवार यांनी वाचवून दाखवली तसेच तुम्हाला विखेनच काम करायच कि नाही ते स्पष्ट सांगा तोंडावर एक व माग एक असं चालणार नाही असे खडे बोल त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सुनावत आपसातील हेवेदावे बाजूला ठेवून पूर्ण ताकदीने महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्यासाठी कामाला लागण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिले

*विखेंचे कार्यकर्ते आमच्याबद्दल चुकीचं सांगतात*
यावेळी विखेंच्या प्रचारात सक्रिय नसलेल्या कार्यकर्त्यांची नावासहित अजित पवार यांनी यादीच वाचून दाखवत त्याचा जाब त्या कार्यकर्त्यांना विचारला त्यावेळी आम्ही प्रामाणिकपने विखेंचे काम करत असूनसुद्धा विखेंचे कार्यकर्ते आमच्याबद्दल चुकीची माहिती देत असल्याचे स्पष्टीकरण कार्यकर्त्यांनी दिले

*आम्ही आज मदत करतो पण उद्या तुम्ही आमच्या विरोधकांना मदत करू नका*
आज आम्ही सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे मदत करतो पण उद्या निवडून आल्यावर तुम्ही आमच्या विरोधकांना जवळ करू नका असे देखील यावेळी कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे यांना सांगितले तसेच तुम्ही ज्या लोकांना बाजारसमितीत मदत केली आज ते विरोधी गटाला सामील झाल्याचे सांगत या प्रकाराबाबत पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी विखे यांच्याकडे जाहीर नाराजी व्यक्त केली

*त्या अध्यक्षाची खरडपट्टी*
या बैठकीत अजित पवार यांनी सकाळी एक आणि रात्री एक अशी भूमिका चालणार नाही तुम्ही निवड केलेले पदाधिकारी आज आपल्यासोबत न दिसता ते विरोधकांसोबत कसे असा जाब विचारत त्या अध्यक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांची चांगलीच खरडपट्टी या बैठकीत काढल्याची माहिती समजते

*आता तरी अनुराधा नागवडे यांना न्याय मिळावा*
आता यावेळेस अनुराधा नागवडे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली पाहिजे नागवडे कुटूंबाने नेत्यांच्या सांगण्यावरून दोन्ही वेळेस माघार घेत पाचपुते व जगताप यांना मदत केली आहे आता अनुराधा नागवडे यांना विधानसभेची उमेदवारी दिली जावी अशी मागणी या बैठकीत कार्यकर्त्यांनी अजित पवार व विखे यांच्याकडे केली

*पोलीस आणि महसूल यंत्रणेवर नाराजी*
श्रीगोंदा पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार आमचं ऐकत नाहीत आमच्या कार्यकर्त्यांची त्याठिकाणी काम होत नाहीत हे दोन्ही अधिकारी आम्हाला आमदारांनी इथं आणलंय असं सांगून आमच्या कामांकडे दुर्लक्ष करतात याबद्दल नाराजी व्यक्त करत आपण महसूलमंत्री तथा पालकमंत्री असून आपण त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचित करावे अशी अपेक्षा अनुराधा नागवडे यांनी मंत्री विखे पाटील यांना बोलून दाखवल्याबाबत माहिती समजली आहे
तोंडावर एक माग एक अशी भूमिका मला चालणार नाही,काय ते स्पष्ट सांगा,अजित दादांचे कार्यकर्त्यांना खडे बोल! तोंडावर एक माग एक अशी भूमिका मला चालणार नाही,काय ते स्पष्ट सांगा,अजित दादांचे कार्यकर्त्यांना खडे बोल! Reviewed by Prashasak on एप्रिल २६, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.