प्रशासक न्यूज,२९एप्रिल
"भारतीय सांस्कृतिक कला नृत्यभारत महोत्सव" यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या "१२ व्या राष्ट्रीय नृत्य महोत्सव २०२४" स्पर्धा नुकत्याच प.भीमसेन जोशी कला मंदिर औंध, पुणे येथे संपन्न झाल्या.सदर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये श्रीगोंदा येथील स्ट्रीट डान्स अकॅडमी च्या संघाने सहभाग घेत मनमोहक आणि दिलखेचक नृत्य आविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करत बक्षिसांची लयलूट केली.
विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे -
छोटा गट - प्रथम क्रमांक (इंडियन फोक डान्स) प्रसन्ना गोलांडे, ओवी सुपेकर, शिवाज्ञा नागावडे, प्रांजल मोरे, मिहिका बायकर, ज्ञानदा घोडके, अक्षरा घोरपडे, प्रिशा पवार.
सब जुनिअर गट (हिप हॉप) उत्तेजनार्थ सिद्धी गुणावरे, प्रविण्या शिंदे, गौरी सकट, सावणी डांगे, आयुश्री डोळे, दिक्षा ढवळे, ईश्वरी कचरे, निखिल निकम, कार्तिकी पवार,
जुनिअर गट - तृतीय क्रमांक (नटरंग-इंडियन फोक डान्स) अपूर्वा शेळके, आद्या गिरमे, प्रज्ञा शिंदे, कार्तिकी शेलार, सौम्या सस्ते, शरयू लोंढे, कार्तिकी पवार, जल पटेल, शरण्या पवार, अनन्या ढगे, मंजिरी लोहगावकर, अंजली पाटील, श्रुती आढाव, श्रुतिका पाचपुते, समीक्षा गायकवाड.
सोलो डान्स - प्रविण्या शिंदे द्वितीय - हीप हॉप, प्रज्ञा शिंदे द्वितीय - हीप हॉप, श्रेया बडवे - कंटेप्ररी उत्तेजनार्थ
यशस्वी विद्यार्थ्यांना डान्स कोरिओग्राफर सुमेध व प्रणाली गजभिये यांचे मार्गदर्शन लाभले.प्रसंगी प्रणाली गजभिये यांना "गुरू विभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कामगिरी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे सर्व पालकांनी अभिनंदन केले आहे.
राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत स्ट्रीट डान्स अकॅडमीचे यश.
Reviewed by Prashasak
on
एप्रिल २९, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
एप्रिल २९, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: