त्या युवकाची आत्महत्या नसून हत्याच!अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा आरपीआय तालुकाध्यक्षांचा ईशारा


प्रशासक न्यूज,दि.२८मार्च

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील तरुण सनी पावलस सुडगे याचा दि. १७/०३/२०२४ रोजी संशयास्पद मृत्यू झाला. मयत तरुणाचा भाऊ फिर्यादी प्रवीण सुडगे याने घातपाताचा संशय व्यक्त केला असतानाही श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

याबाबत फिर्यादी प्रवीण सुडगे यांनी पोलीस अधिक्षक अहमदनगर यांना निवेदन देवून मयत सनी सुडगे यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मयत तरुण हा आरोपीकडे ट्रक्टर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. प्रेमप्रकरणामुळे दोन महिन्यापासून त्यांचे वाद चालू होते. या वादातूनच हत्या झाल्याचा मयत तरुणाच्या कुटुंबातील सदस्य तसेच श्रीगोंदा तालुक्यातील समाजातील,चळवळीतील कार्यकर्ते यांनी संशय व्यक्त केला आहे सदरील घडलेली घटना अत्यंत वाईट असून समस्त आंबेडकरी समाजात याविषयी मोठा रोष निर्माण झालेला आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने राज्यात व देशात तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटतील, याबाबत पोलिसांना निवेदन देउन निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, भाऊसाहेब घोडके, कुणाल शिरवाळे, युवराज घोडके, योगेश घोडके, किरण शिंदे, शशिकांत घोडके, शेखर घोडके, अमोल घोडके, जॉन घोडके,पप्पू जगताप इत्यादी आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप म्हणाले...
पिडीत कुटुंबावर आरोपी व आरोपीचे नातेवाईक केस मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत. पिडीत कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे. तसेच सदर घटनेची सखोल चौकशी करून संबंधित आरोपी अशोक धालवडे व ईतर आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा रिपाईच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन राज्यात आणि देशात छेडण्यात येईल.
त्या युवकाची आत्महत्या नसून हत्याच!अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा आरपीआय तालुकाध्यक्षांचा ईशारा त्या युवकाची आत्महत्या नसून हत्याच!अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा आरपीआय तालुकाध्यक्षांचा ईशारा Reviewed by Prashasak on मार्च २८, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.