तहसीलदार म्याडम थोडं इकडही लक्ष द्या!सामान्य जनता मेटाकुटीस!


प्रशासक न्यूज,दि.२८मार्च

सामान्य जनतेच्या गोर गरीब लोकांच्या आयुष्यातील महत्वाचा घटक म्हणजे रेशनकार्ड परंतु हेच रेशनकार्ड मिळवण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे अनेकदा तहसील कार्यालयात हेलपाटे मारूनसुद्धा लोकांना रेशनकार्ड मिळत नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे

केंद्र सरकार व राज्य सरकारने हे कुपन ऑनलाईन करून त्यामाध्यमातून गरीब लोकांसाठी अनेक उपयोगी योजना सुरु केल्या आहेत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना,आयुष्यमान भारत योजना या योजनाचा लाभ मिळवण्यासाठी रेशनकार्ड ऑनलाईन करणे गरजेचे आहे परंतु सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही लोकांना हे कुपन ऑनलाईन करून मिळत नाही कुपन ऑनलाईन करण्यासाठी खासगी कॉम्प्युटर ऑपरेटर श्रीगोंदा तहसील कार्यालयात नेमण्यात आलेले आहेत परंतु तरीसुद्धा लोकांचे कुपन ऑनलाईन होत नाहीत त्यामुळे अनेक गरीब लोकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत नाही

नवीन कुपण काढायचे असेल किंवा कुपणात दुरुस्ती यासारख्या किरकोळ कामांसाठी सुद्धा लोकांना श्रीगोंदा तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत पुरवठा विभागाकडे दिलेले अर्ज सुद्धा गहाळ होत असल्याच्या अनेक तक्रारी रोज समोर येत आहेत तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला पुरुष यांना या कामासाठी सतत श्रीगोंद्याला यावं लागत आहे हेलपाटे मारूनही कुपन मिळत नाही ऑनलाईन होत नाही म्हणून नागरिक रडकुंडी आले आहेत परंतु याकडे लक्ष द्यायला मात्र कुणालाच वेळ नाही त्यामुळे आता स्वतः तहसीलदार वाघमारे म्याडम यांनी या प्रकरणात लक्ष घालून पुरवठा विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आनणे गरजेचे आहे

दलालांचा सुळसुळाट आणि गरिबांची लूट
तहसील कार्यालयातील या भोंगळ कारभाराबाबत न्याय कुणाकडे मागायचा या संभ्रमावस्थेत अडकलेल्या सामान्य लोकांना मग दलालांचा आधार घ्यावा लागत आहे परंतु दलालांकडून पैसे घेऊनही काम होत नसल्यामुळे सामान्य जनतेची आर्थिक लूट होत आहे

या सर्व प्रकारबाबत श्रीगोंदा तहसीलदार वाघमारे म्याडम यांची प्रतिक्रिया जाणून घेन्यासाठी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही
तहसीलदार म्याडम थोडं इकडही लक्ष द्या!सामान्य जनता मेटाकुटीस! तहसीलदार म्याडम थोडं इकडही लक्ष द्या!सामान्य जनता मेटाकुटीस! Reviewed by Prashasak on मार्च २८, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.