अखेर ठरल! पण---नेत्यांचा साधेपणा लोकांना भावणार कि,डॉक्टरांची यंत्रणा पुन्हा भारी भरणार?


प्रशासक न्यूज,दि.३१मार्च
विशाल अ चव्हाण 

लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासून नगर दक्षिण मधील लोकसभा उमेदवार आणि त्यांच्यातील लढतीवरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते लंके विरुद्ध विखे लढत होणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या परंतु दिवसागणिक बदलणाऱ्या राजकीय घडामोडीमुळे नेमक काय होणार हे खात्रीशीर रित्या समजतं नव्हते

विद्यमान खासदार डॉ सुजय विखे यांचेच तिकीट कापले जाणार अश्या चर्चा सुरुवातीला होत होत्या परंतु विखे पिता पुत्रांनी थेट दिल्ली दरबारी आपले वजन वापरून अखेर ही चर्चा खोटी ठरवली आणि भाजपकडून डॉ सुजय विखे यांना उमेदवारी फायनल झाली परंतु त्यानंतर सुद्धा खरा सस्पेन्स बाकी होता तो म्हणजे विखेंच्या विरोधात नेमक कोण लढणार सौ राणी लंके कि आ निलेश लंके परंतु काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अधिकृत रित्या आ निलेश लंके यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली असून अखेर दक्षिणेतून लंके विरुद्ध विखे अशीच लढत होणार हे फायनल ठरल आहे

गेल्या काही वर्ष्यापासून आ लंके व विखे कुटुंबियांमध्ये सुरु असलेले राजकीय युद्ध हे सर्वश्रुत आहे याबाबत लंके यांनी दोन दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांच्या बैठकीत व माध्यमानसमोर विखे पिता पुत्रांनी आपल्याला प्रचंड त्रास दिला विकासकामात खोडा घातल्याचा आरोप केला होता विखे आणि लंके यांच्यातील याच राजकीय आरोप प्रत्यारोप आणि राजकीय वैमनस्यामुळे आता या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे उमेदवारी जाहीर होणायाआधीपासून सोशल मीडिया,वर्तमानपत्रे कट्ट्यावरील गप्पा यांमध्ये फक्त एकच चर्चा रंगत होती विखे पुन्हा बाजी मारणार कि यावेळी भाजप च्या बालेकिल्ल्याला आ लंके सुरुंग लावत विजय मिळवणार

भाजपकडून अर्थात महायुतिकडून विद्यमान खासदार डॉ सुजय विखे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट म्हणजेच महाविकास आघाडीकडून आ निलेश लंके हे उमेदवार फायनल झाले आहेत आता त्यात सुद्धा या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी कोण कोण करत,कोण कुणाची मत घेत,तसेच मराठा,ओबीसी बांधव मतदारांची भूमिका,मतदारसंघातील दलित,मुस्लिम,तसेच इतर समाजातील लोक कुणाला पसंती देतात,नवमतदार,तरुणवर्ग हे कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात तसेच मतदानाची टक्केवारी या गोष्टींचा परिणाम निवडणूक निकालावर दिसून येणार आहे

आ निलेश लंके यांच्या जमेच्या बाजू
त्यांचा तळागाळातील कार्यकर्ते,सामान्य लोकांशी असलेला दांडगा संपर्क,कोव्हीड काळात केलेलं काम,सोशल मिडीयात आणि तरुण वर्गात त्यांची असलेली क्रेज,मागील दोन वर्ष्यापासून सुरु असलेली तयारी,दक्षिणेतील स्थानिक उमेदवार,लंके यांच्यातील अतिशय साधेपणा,साधेपणाच्या जोरावर समोरच्याला आपलस करण्याची असलेली त्यांची शैली,२४तास फोनवर अव्हेलेबल असणं,कुठल्याही कार्यकर्त्याच्या मध्यस्थीशिवाय लंके यांच्याशी कुणालापण थेटपणे संपर्क साधता येतो,त्यांनी केलेली सामाजिक मदत या आ निलेश लंके यांच्या जमेच्या बाजू आहेत

लंके यांची कमकुवत बाजू
श्रीगोंदा,पारनेर,नगर सोडता इतर तालुक्यामध्ये कमी संपर्क,स्वतःची यंत्रणा नसून कार्यकर्त्यांच्या भरवश्यावरच यंत्रणा राबवावी लागणार,पक्षाची ताकद या लंके यांच्या दृष्टीने कमकुवत बाजू आहेत

डॉ सुजय विखे यांची जमेची बाजू
खासदार असताना पाच वर्ष्यात केलेली विकासकामे,आजोबांपासून प्रत्येक तालुक्यात असलेला कार्यकर्त्यांचा वेगळा गट,स्वतःची असेलेली भक्कम यंत्रणा,पक्षाची ताकद,मोदींचा करिष्मा,मतदारसंघात असलेला जनसंपर्क

विखे यांच्या कमकुवत बाजू
बाहेरील उमेदवार,शेतकरी वर्गात असलेली नाराजगी,फोनवर कुणाचाच होत नसलेला संपर्क,नेहमी ठराविक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गराड्यात फिरणे,सामान्य लोकांना थेट भेट नाही,स्वभावातील अहमपणा,शेवटच्या फळीतील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क नाही,पक्षांतर्गत नाराजगी,दक्षिणेत भरघोस कामे नाहीत उत्तरेकडेच जास्त असलेली ओढ या सुजय विखे यांच्या दृष्टीने कमकुवत बाजू आहेत

निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढत होत असल्यामुळे कार्यकर्त्यांसह मतदा्रांमध्ये सुद्धा आता उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून दोन्ही उमेदवार स्ट्रॉंग असल्यामुळे आता खऱ्याअर्थाने तुल्यबळ लढत होणार आहे

उत्तरेतील पार्सल परत पाठवणार असा चंग बांधलेले लंके यांचे कार्यकर्ते तर विकासकामाच्या जोरावर आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी विखेच विजयी होणार असे छातीठोक सांगणारे विखे यांचे कार्यकर्ते त्यामुळे उन्हाचा कडाका वाढत असतानाच या दोन्ही उमेदवारांमुळे नगर दक्षिणेतील राजकीय वातावरण देखील आता चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये सोशल वार देखील सुरु झाले आहे

परंतु निलेश लंके यांना सर्वच स्तरातून मिळणारा मोठा पाठींबा हे सुजय विखे यांची आणि महायुतीची डोकेदुखी वाढवणार हे मात्र निश्चित असे असले तरी लंकेंची तुतारी वाजणार कि विखेंचे कमळ पुन्हा उमलणार हे मात्र मतदार राज्या आपल्या मतदानाचा संविधानिक अधिकार वापरून कुणाला झुकत मापं देतो यावर अवलंबून राहणार असून निकालाच्या दिवशीच खरी परिस्थिती समजणार आहे
अखेर ठरल! पण---नेत्यांचा साधेपणा लोकांना भावणार कि,डॉक्टरांची यंत्रणा पुन्हा भारी भरणार? अखेर ठरल! पण---नेत्यांचा साधेपणा लोकांना भावणार कि,डॉक्टरांची यंत्रणा पुन्हा भारी भरणार? Reviewed by Prashasak on मार्च ३०, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.