महिलेला मारहाण करून लाखोंचा मुद्देमाल लंपास!


प्रशासक न्यूज,दि.९एप्रिल

श्रीगोंदा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात पुन्हा चोरी आणि दरोड्याचे सुरु झालेले सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत आधीच्याच घरफोड्या आणि चोऱ्यांचा तपास लावण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आलेले नसतानाच आज पुन्हा श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगावबोडखा गावात एका महिलेला मारहाण करून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १लाख १९हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानीं चोरून नेल्याची घटना आज दि.९रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे

सदर दरोड्या बाबत विमल दशरथ शिर्के रा शिरसगावबोडखा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यानंविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेबाबाबत माहिती समजल्यानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर घटनास्थळी भेट दिली श्वानपथक,ठसेतज्ञाना देखील सदर ठिकाणी पाचारण करण्यात आले होते

शिरसगाव बोडखा येथील आपल्या राहत्या घरी विमल शिर्के या झोपलेल्या होत्या त्यांचा एक मुलगा शेजारच्या खोलीत तर दुसरा मुलगा आणि सून घराच्या छतावर झोपले होते आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यानीं शिर्के यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील सामानाची उचकपाचक करण्यास सुरुवात केली यामुळे विमल शिर्के या जाग्या झाल्या त्यामुळे चोरट्यानीं त्यांना लोखंडी कत्तीने मारहाण करत घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला

मराठी वर्ष्याच्या पहिल्या दिवशीच झालेल्या या दरोड्याच्या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे

चौकट/-कोम्बिंग ऑपरेशन राबवणे गरजेचे
श्रीगोंदा तालुक्यात सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तसेच असे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांना ताब्यात घेणे गरजेचे आहे जेणेकरून चोरीचा तपास लागण्यासोबतच या घटनांना ब्रेक लागण्यास मदत होईल 

श्रीगोंदा पोलिसांना या आधीच्याच चोरीच्या घटनांनचा तपास लावण्यात अपयश आलेले आहे त्यामुळे आजच्या दरोड्याच्या घटनेसह मागील काही दिवसात झालेल्या चोरी,घरफोडी यांचा तपास लावण्याचे आवाहन श्रीगोंदा पोलिसांसमोर उभे ठाकले आहे
महिलेला मारहाण करून लाखोंचा मुद्देमाल लंपास! महिलेला मारहाण करून लाखोंचा मुद्देमाल लंपास! Reviewed by Prashasak on एप्रिल ०९, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.