प्रशासक न्यूज,दि.४मार्च
स्विफ्टनलिफ्ट स्विफ्ट द सोलुशन लिफ्ट द बिझनेस. हे ब्रीद वाक्य असलेले स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया फाउंडेशन पुणे यांनी नुकतेच महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार 2024 जाहीर केले असून 3 मार्च 2024 रोजी पुणे येथे पुरस्काराचे वितरण अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते करण्यात आले
श्रीगोंदा येथील अरिहंत उद्योग समूह अध्यक्ष सौ प्रतिभा गांधी यांची यंगेस्ट बिझनेस वूमन ऑफ द इअर या पुरस्कारासाठी निवड केली असून सदर पुरस्कार अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारला आहे. सौ गांधी यांचा मागील 4 वर्षात बिजनेस क्षेत्राचा आलेख हा वाढता आहे त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून समाजसेवा करतांना कोरोना महामारीत अनेक गरजू गरीब कुटुंबांना मदत मिळवून दिली व उपचारासाठी निलेश लंके प्रतिष्ठान कडून मदत केली. हे करत असताना महिलांना सोबत घेऊन स्वतःचा उद्योग त्यांनी सुरू केला त्यात अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला वेग वेगळे अन्न पदार्थ तयार करून त्याचे मार्केटिंग स्वतः केले. फूड एक्स्पो तसेच कृषी महोत्सवात स्टॉल देऊन. आठवडे बाजार व इतर व्यावसायिकांना माल विक्री करत उद्योग उभा करून यशस्वी केला म्हणुन हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे
सौ गांधी यांना महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार प्रदान
Reviewed by Prashasak
on
मार्च ०४, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च ०४, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: