तब्बल 15 वर्षानंतर नाशिक महसूल विभागीय स्पर्धेत अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघाला जेतेपद (सुवर्णपदक)


प्रशासक न्यूज,दि.४मार्च

जळगाव येथे आयोजित विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय क्रिकेट संघाचा पराभव करून एकहाती विजय मिळवला.

नाशिक संघाने 15 ओव्हर मध्ये सर्वबाद 93 धावा केल्या होत्या प्रत्युत्तरादाखल नगर संघाने अवघ्या 12 ओव्हर मध्ये 4 खेळाडूंच्या बदल्यात 94 धावा करून सहज विजय प्राप्त केला. धावांचा पाठलाग करताना अमोल मंडलिक यांनी 39 धावा आणि कर्णधार हेमंत ढोकले यांनी नाबाद 25 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

संपूर्ण स्पर्धेत नगर संघाने धुळे, जळगाव आणि नाशिक संघाचा एकहाती पराभव करून नगर जिल्ह्याला जेतेपद मिळवून दिले.

स्पर्धेदरम्यान अमोल मंडलिक, सागर भापकर आणि विजय भोईर यांचा अष्टपैलू खेळ आणि कर्णधार हेमंत ढोकले यांची फलंदाजीच्या जोरावर नगर संघाने विभागीय स्पर्धेवर वर्चस्व गाजवले.

पारितोषिक- विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे साहेब यांच्या हस्ते दिले गेले.

संघ- हेमंत ढोकले(कर्णधार), पद्माकर गायकवाड(उपकर्णधार), अमोल मंडलिक,पांडुरंग कोतकर,सागर भापकर,विजय भोइर,अमोल आंबरे,योगेश तांगडे,राहुल कोळेकर,युवराज जारवाल,विजय चव्हाण,आकाश काशिकेदार,अंबादास नवगिरे,सचिन शिंदे

संघ प्रशिक्षक म्हणून श्रीगोंदा पारनेर चे प्रांत श्री गणेश राठोड यांनी जबाबदारी पार पाडली

संघाला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,अप्पर जिल्हाधिकारी मापारी व अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले

तब्बल १५ वर्ष्यानंतर नाशिक महसूल विभागीय स्पर्धेत अहमदनगर जिल्हा संघाला विजेतेपद भेटल्यामुळे संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
तब्बल 15 वर्षानंतर नाशिक महसूल विभागीय स्पर्धेत अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघाला जेतेपद (सुवर्णपदक) तब्बल 15 वर्षानंतर नाशिक महसूल विभागीय स्पर्धेत अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघाला जेतेपद (सुवर्णपदक) Reviewed by Prashasak on मार्च ०४, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.