प्रशासक न्यूज,१३मार्च
श्रीगोंदा शहरासह तालुक्यात सुरु झालेले चोऱ्यांचे सत्र काही थांबताना दिसत नाही कधी घरफोडी तर कधी मंदिरात चोरी अश्या घटना सातत्याने घडतं आहेत श्रीगोंदा शहरात मागील काही दिवसात खेडकर मळ्यात झालेल्या चोरीचा अजून छडा लागलेला नसतानाच आज रात्री श्रीगोंदा शहरानजीक असलेल्या मखरेवाडी परिसरातील गणेशनगर येथे राहणाऱ्या भरत मारुती वाळके यांच्या घरी चोरट्यानीं चोरी करत Mh-16 DB- 4666 एन एस ही पल्सर दुचाकी व रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरट्यानीं चोरून नेला आहे
रात्री वाळके कुटुंबिय घरात झोपलेले असताना चोरट्यानीं घरात प्रवेश करत सदर मुद्देमाल चोरून नेला आहे शहरातील भर वस्तीत झालेल्या चोरीच्या घटनेचा तपास लागलेला नसतानाच पुन्हा झालेली चोरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणारी आहे
*नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे*
सतत होणाऱ्या चोरीच्या घटना विचारात घेऊन नागरिकांनी देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे रोख रक्कम किंवा सोन्याचे दागिने घरात न ठेवता बँकेत लॉकर मध्ये ठेवावेत सोसायटीच्या ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे बसवावेत घराना सेफ्टी डोअर बसवावेत ही खबरदारी सर्व नागरिकांनी घेणे जरुरी आहे
चोऱ्यांचे सत्र काही थांबेना,या भागात पुन्हा चोरी
Reviewed by Prashasak
on
मार्च १२, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च १२, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: