श्रीगोंदा शहरानजीक अपहरणाचा थरार!


प्रशासक न्यूज,दि.२६मार्च

नाशिक येथील द्राक्ष व्यापाऱ्याचे तीन ते चार लोकांनी अपहरण केल्याची घटना आज रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरानजिक श्रीगोंदा काष्टी रस्त्यावर कानन पेट्रोल पंपा जवळ घडली आहे

घटनेबाबत माहिती समजताच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या घटनेबाबत प्राथमिक समजलेली माहिती अशी की नाशिक येथील द्राक्ष व्यापारी हे चार चाकी वाहनातून श्रीगोंदा काष्टी रस्त्याने जात असताना पाठीमागून आलेल्या चार चाकी वाहनातील तीन ते चार लोकांनी गाडी आडवी लावून सदर द्राक्ष व्यापाऱ्याचे अपहरण केले या घटनेनंतर द्राक्ष व्यापाऱ्याच्या वाहनावरील चालकाने तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधत घटनेबाबत माहिती दिली सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे

आर्थिक वादातून अपहरण झाले असण्याचा संशय
अनेक द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांची द्राक्ष नेतात त्यातील काही मालाचे पैसे लगेच देतात परंतु उरलेल्या मालाचे पैसे देण्यास टाळाटाळ करतात अश्याच आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणातुन सदर अपहरण झाले असण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत असून नेमका खरा प्रकार काय हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे
श्रीगोंदा शहरानजीक अपहरणाचा थरार! श्रीगोंदा शहरानजीक अपहरणाचा थरार! Reviewed by Prashasak on मार्च २६, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.