प्रशासक न्यूज,दि.२२मार्च
श्रीगोंदा शहरात सुरु झालेले चोऱ्यांचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही खेडकर मळा,मखरेवाडी परिसरात झालेल्या चोरीच्या घटनांचा छडा लागलेला नसतानाच काल दि.२१ रोजी सकाळी साडेअकरा ते संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जानव्ही हाईट अपार्टमेंट मधील फ्लॅट क्र ३०१मध्ये दिवसा घरफोडी ची घटना घडली असून त्यात आठ तोळे वजनाचे २लाख ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरट्यानीं चोरून नेला आहेसदर चोरीच्या घटनेबाबत पप्पू बलभीम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल गायकवाड कुटुंबीय घर बंद करून बाहेर गेले असता चोरट्यानीं भरदिवसाचं त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून सदर मुद्देमाल चोरून नेला गायकवाड कुटुंबीय संध्याकाळी घरी परतल्यावर घरी चोरी झाल्याचे समजले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे
श्रीगोंदा पोलिसांना आधीच्याच चोरीच्या घटनेचा तपास लावण्यात अपयश आलेले असतानाच एवढ्या मध्यवस्तीतील अपार्टमेंट मध्ये भरदिवसा झालेल्या चोरीने एकच खळबळ उडाली असून रात्री होणाऱ्या चोऱ्या आता दिवसा होऊ लागल्यामुळे श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून श्रीगोंदा पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक कमी झाल्याचे बोलले जात आहे
आता भरदिवसाचं घरफोडी,शहराच्या मुख्य भागातील घटना
Reviewed by Prashasak
on
मार्च २१, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च २१, २०२४
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: