जीर्णोद्धार व्हावा ही एकमुखी मागणी/-काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता


प्रशासक न्यूज,दि.१८मार्च

श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांच्या ३२६ व्या संजीवन समाधी सोहळा व यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री तुकाराम गाथा व योगसंग्राम ग्रंथ पारायण सोहळा सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली ह.भ.प.संजय महाराज धोंडगे नाना यांनी काल्याचे कीर्तन रुपी सेवा सादर केली यावेळी उपस्थित सर्वच नेतेमंडळीनी आपल्या शुभेच्छा देताना शेख महमंद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी ईच्छा व्यक्त करत त्यासाठी हवी ती मदत देण्याचे आश्वासन दिले यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते यात महिला भाविकांची मोठी संख्या लक्षणीय होती

दि.११मार्च रोजी सप्ताहाला सुरुवात झाली मागील आठ दिवसात या सप्ताहात ह.भ.प.भूषण महाराज महापुरुष,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर,ह.भ.प.कबीर महाराज आत्तार,ह.भ.प.दीपक महाराज भोयटे,ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे,ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील या कीर्तनकारांनी कीर्तनसेवा सादर केली

दि २० बुधवारी संत शेख महंमद महाराजांचा यात्रा उत्सव होणार आहे या यात्रेसाठी शहरासह संपूर्ण तालुका व तालुक्याच्या बाहेरून भाविक मोठी गर्दी करतात यात्रेत येणारे गगनचुंबी पाळणे, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम हे यात्रेचे मुख्य आकर्षण असते

आज संत शेख महंमद महाराज प्रांगणात संपन्न झालेल्या काल्याच्या कीर्तनानंतर बोलताना नेतेमंडळींनी मंदिराचा जीर्णोद्धार कुठल्याही परिस्थितीत करण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच जीर्णोद्धार झाल्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेले संत शेख महंमद महाराज मंदिर हे प्रति शिर्डी म्हणून देशात नावारूपास येईल अशी अपेक्षा व्यक्त करत जीर्णोद्धारासाठी जे दोन गटात कायदेशीर वाद सुरु आहेत त्याबाबतीत दोन्ही गटाने सामंजस्याची भूमिका घेत दोन पाऊले मागे येवून निर्णय घ्यावा असे मत देखील यावेळी काही महिला नेत्यांनी बोलून दाखवले जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी यावेळी बोलताना जीर्णोद्धारच्या कामात कुणीही अडथळा आणू नये अन्यथा आता जनतेचा संयम सुटेल आणि यात्रा झाल्यानंतर ग्रामसभा घेऊन त्यात जनता निर्णय घेईल मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी आता माघार घेतली जाणार नाही असा गर्भित ईशारा दिला त्यानंतर यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळराव मोटे पाटील यांनी गुढीपाडव्या पर्यत वाट बघून मग निर्णय घेऊ असे सांगितले

यावेळी मनोहर पोटे,राजेंद्र नागवडे,बाबासाहेब भोस,बाळासाहेब नाहाटा,सौ प्रतिभा वहिनी पाचपुते,डॉ प्रणोती माई जगताप,श्रीमती सुनंदा काकी पाचपुते,घनश्याम शेलार,ह.भ.प. माणिक महाराज मोरे,आ निलेश लंके,सौ धनश्री विखे यांनी आपले शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले

ह.भ.प.अशोक महाराज आळेकर व नगरसेवक शहाजी भाऊ खेतमाळीस यांनी सूत्रसंचालन केले

जीर्णोद्धार व्हावा ही एकमुखी मागणी/-काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता जीर्णोद्धार व्हावा ही एकमुखी मागणी/-काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता Reviewed by Prashasak on मार्च १८, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.