काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी दरेकर तर शहराध्यपदी पोटे यांची निवड!


प्रशासक न्यूज,दि.२१फेब्रुवारी

काँग्रेसच्या श्रीगोंदा तालुका प्रभारी अध्यक्ष पदी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना संचालक प्रशांत दरेकर यांची तर श्रीगोंदा शहराध्यक्ष पदी माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांची निवड नूतन जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केली आहे.

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी सौ अनुराधा नागवडे यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यातील काँग्रेस सावरण्याची आव्हान माजी महसूल मंत्री विधी मंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढे होते अखेर तालुक्यात संघटन आणि तालुका अध्यक्ष पदाचा अनुभव असलेल्या प्रशांत दरेकर यांची तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.नूतन तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी अल्पावधीत तालुक्यात विविध प्रश्नाच्या आंदोलनातून तसेच काँग्रेस पक्षात विविध पदावर काम करत नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत संचालक पदी विजयी झाले ते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय मानले जातात.

तर मनोहर पोटे यांनी २०१६ ते २०१९ या कालावधीत नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून विकास कामांतून शहराचा चेहरा मोहरा बदलल्याने २०१९ च्या नगरपालिका निवडणुकीत पत्नी सौ.शुभांगी ताई पोटे या जनतेतून नगराध्यक्ष पदी निवडून आल्या गेली साडेसात वर्ष पोटे दांपत्याने विकास कामातून शहर आणि तालुक्यात जनसंपर्क ठेवल्याने मनोहर पोटे यांची शहरअध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

नूतन तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर आणि शहराध्यक्ष मनोहर पोटे यांनी श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्ष विस्तार करण्याचे ध्येय ठेवले असून काँग्रेसची ध्येय धोरणे जनमानसात पोहोचवून खा.राहुल गांधी,काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे,प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले, विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात,जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात संघटन मजबूत करण्याचा मानस व्यक्त केला.
काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी दरेकर तर शहराध्यपदी पोटे यांची निवड! काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी दरेकर तर शहराध्यपदी पोटे यांची निवड! Reviewed by Prashasak on फेब्रुवारी २१, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.