प्रशासक न्यूज,दि.१९फेब्रुवारी
श्रीगोंदा शहरातील खेडकर मळ्यात आज मध्यरात्री दोन ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी धाडसी चोरी करत अंदाजे अडीच ते तीन लाख रुपये रोख रक्कम आणि आठ ते दहा तोळे सोन्याचे दागिने असा एकूण अंदाजे आठ ते दहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे
शहरातील मध्यवस्तीत राहत असलेले भानुदास खेडकर हे रात्री त्यांच्या घराच्या हॉलमध्ये झोपले होते त्यांचा मुलगा शेजारच्या रूममध्ये झोपला होता खेडकर कुटुंबिय गाढ झोपेत असतानाच अज्ञात चोरट्यानी घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा तोडून किचन मधून घरात प्रवेश करत किचनच्या शेजारील रूम मधील कपाटात ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला
आज पहाटे झोपेतून उठल्यानंतर खेडकर यांना त्यांच्या घरात उचकपाचक झाल्याचे व किचन चा दरवाजा तोडल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिति दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली श्वानपाथकाला घटनास्थळी पाचरण करण्यात आले होते श्वानाने घरापासून जवळ काही आंतरपर्यत माग काढला
पारगाव येथील मंदिरातील चोरीचा छडा लावून दोन दिवस उलटत नाहीत तोपर्यंतच शहरात एवढी मोठी धाडसी चोरी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे आणि पुन्हा पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे
चौकट/-पाळत ठेवून चोरी झाल्याची शक्यता
कालच खेडकर यांनी कांदे विकले होते त्या पट्टीचे अडीच ते तीन लाख रुपये रोख रक्कम आणून त्यांनी घरात ठेवले होते रक्कम ठेवलेल्या रूममध्येच चोरट्यानी प्रवेश करून ही रक्कम चोरून नेली खेडकर यांच्या घरात एवढी रोख रक्कम असल्याची चोरट्यानी आधीच माहिती असून त्यांनी पाळत ठेवून ही चोरी केल्याचे शक्यता व्यक्त होत आहे
श्रीगोंद्यात भरवस्तीत धाडसी चोरी!
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १८, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १८, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: