प्रशासक न्यूज,दि.१७फेब्रुवारी
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील ग्रामदैवत सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून चोरी गेलेल्या मंदिरातील सर्व चांदीच्या दागिन्यांसह ही चोरी करणाऱ्या तीन आरोपीना पोलिसांनी जेरबंद केले आहे
ही चोरी करणारा मुख्य आरोपी भास्कर खेमा पथवे वय ४६,रा नांदूर दुमाला ता संगमनेर याच्यासह त्याचे साथीदार राजू उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे वय ३०,रा नांदूर दुमाला ता संगमनेर,भाऊराव मुरलीधर उघडे वय ३६,रा विटा ता अकोले या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आरोपींनी सुद्रीकेश्वर मंदिरातून चोरलेले चांदीचे सर्व दागिने तसेच या चोरीसाठी वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे
*असा झाला चोरीचा तपास*
१२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी मंदिरात चोरी करत तेथील सिंहासनाच्या पाठीमागे लावलेली जवळपास ४० किलो वजनाची २४ लाख रुपये किंमतीची चांदी चोरून नेली होती सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात चोरी झाल्यामुळे गावाकऱ्यांच्या संतप्त भावना होत्या त्यामुळे पोलिसांना नुसते आरोपी जेरबंद न करता चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे हे एक मोठे आव्हान होते
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात,पोलीस अंमलदार बबन मखरे,रवींद्र कर्डिले, अतुल लोटके, रोहित मिसाळ,अमोल कोतकर, अमृत आढाव आकाश काळे, भाऊसाहेब काळे रंजीत जाधव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, संतोष खैरे,देवेंद्र शेलार,उमाकांत गावडे,अर्जुन बडे या पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली
मंदिरातील सिसिटीव्ही फुटेज व या आधी मंदिर चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढत अभिलेख तपासून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली तांत्रिक विश्लेषण व या सर्व तपासाच्या आधारे हा गुन्हा भास्कर खेमा पथवे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने व त्याच्या साथीदारांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले
आरोपी पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान
या चोरीतील आरोपी निष्पन्न झाला परंतु सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो नांदूर दुमाला गावच्या शिवारात डोंगरावर राहत असून त्याच्या घराकडे जाण्यासाठी एकच रस्ता असून त्याच्या घराकडे कुणी जात असल्यास त्याला लांबूनच ते दिसते आणी घराकडे कुणी येत असल्याचा त्याला संशय आल्यास तो डोंगरात पळून जातो अशी माहिती पोलिसांना समजली त्यामुळे या आरोपीला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते
*पोलिसांनी डोंगरात ठोकला दोन दिवस मुक्काम*
आपण आल्याची आरोपीला जरासुद्धा भनक लागू नये आणि आरोपी हातून निसटू नये म्हणून पोलिसांनी या आरोपीच्या घरापर्यत पायी चालत जाऊन दोन दिवस त्याच्या घराच्या बाजूला मुक्काम ठोकला आणि आरोपी घरी आल्याचे समजताच आरोपीच्या घराला चारही बाजूनी घेराव घालत आरोपीला घरातून मोठ्या शीताफीने पोलिसांनी पकडले
या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याच्या वरील दोन साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली भाऊराव उघडे याच्या घरात पुरून ठेवलेले चांदीचे दागिने त्याने काढून पोलिसांना दिले
चोरीतील मुख्य आरोपी भास्कर पथवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर नाशिक,नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत तर दुसरा आरोपी राजेंद्र उघडे याच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात याआधी एक गुन्हा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे
तपासी पथकाचे कौतुक
या चोरीतील आरोपीना मुद्देमालासह जेरबंद केल्यामुळे सर्वच स्तरातून तपास करणाऱ्या पोलीस पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
दोन दिवस पोलिसांचा डोंगरात मुक्काम--आणि अश्या प्रकारे सापडले मंदिर चोरीतील आरोपी
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १७, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १७, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: