ग्रामस्थांचा गावबंद ठेवून त्या घटनेचा तीव्र निषेध!


प्रशासक न्यूज,दि.१२फेब्रुवारी

श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक गावचे ग्रामदैवत श्री सुद्रीकेश्वर महाराज मंदिरात आज रात्री बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरी झाली या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून संपूर्ण पारगाव गावासह आजूबाजूच्या गावातील भाविकांमध्ये देखील या चोरीमुळे संतापाचे वातावरण आहे गावाकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरातच चोरट्यानी हात टाकल्यामुळे आज पारगाव ग्रामस्थांनी संपूर्ण गावबंद ठेवून निषेध सभा घेत या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली तात्काळ आरोपी जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे

या चोरीत चोरट्यानी मंदिरातील ४०किलो वजनाचे चांदीचे प्रभावळ,देवाचे आभूषणे असा एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या घटनेची माहिती समजल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली श्वानपथकाने गावाच्या बाहेर पर्यत माग काढला एलसीबीच्या पथकाने या ठिकाणी येऊन पाहणी करत तपासला सुरुवात केली

*दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद*

दरम्यान मंदिराचा दरवाजा तोडताना दोन चोरटे मंदिराच्या बाहेर बसवलेल्या सिसिटीव्ही मध्ये कैद झाले आहेत त्यामुळे या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून या फुटेजमुळे लवकर आरोपी जेरबंद होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
ग्रामस्थांचा गावबंद ठेवून त्या घटनेचा तीव्र निषेध! ग्रामस्थांचा गावबंद ठेवून त्या घटनेचा तीव्र निषेध! Reviewed by Prashasak on फेब्रुवारी १२, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.