प्रशासक न्यूज,दि.१२फेब्रुवारी
श्रीगोंदा पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे सामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागत आहेत असे गंभीर आरोप करत पोलिसांनी या भ्रष्टाचाराचे आणि नागरिकांनी कोणत्या कामासाठी किती पैसे पोलिसांना द्यायचे याबाबत एक रेटकार्ड(दरपत्रक)पोलीस स्टेशनच्या बाहेर लावावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी ऍड सुमित बोरुडे यांनी आज श्रीगोंदा तहसील कार्यलयासमोर उपोषण सुरु केले आहे
श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत अश्या अनोख्या मागणीसाठी या वकील तरुणाने सुरु केलेल्या या उपोषणाची शहरात चांगलीच चर्चा होत आहे
श्रीगोंदा पोलीस निरीक्षक कायद्याचे रक्षण करण्याऐवजी कायदा मोडणाऱ्यांना संरक्षण देत आहेत,नेवासा पोलीस स्टेशनला कार्यरत असताना एका ऑडिओ क्लिपमुळे वादग्रस्त ठरलेल्या आणि त्यावेळेस निलंबीत झालेले कर्मचारी संभाजी गर्जे यांच्याकडे तडीपारीचा महत्वाचा टेबल देण्यात आला आहे गर्जे हे अनेक गुन्हे दाखल असलेल्या सरांईत गुन्हेगारांना तडीपारीची भीती दाखवून आर्थिक तडजोड करत आहेत या तडजोडीमुळे सराईत गुन्हेगारांना तडीपार केले जात नाही लाचखोरीचा आरोप असलेल्या व पूर्वी निलंबीत कर्मचाऱ्याला रायटर म्हणून का नेमले त्यांचा हेतू काय याची चौकशी व्हावी
गुन्ह्यांची संख्या कमी दाखवण्यासाठी जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले जात नाहीत फिर्यादीस राजकीय लोकांकडे पाठवले जाते दूध भेसळ प्रकरणात सुद्धा आर्थिक तडजोडीतून अनेक आरोपीची नावे कमी करण्यात आले सदर प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचारची चौकशी व्हावी पारगाव सुद्रिक येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोटयावधी रुपयांची आर्थिक फसवणूक झालेली असताना देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली मढेवडगाव खून प्रकरण दडपण्यासाठी फिर्याद घेण्यास टाळाटाळ झाली अवैध धंदे व फोफावले आहेत या मागण्यांसाठी व श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या भ्रष्ट मनमानी कारभाराविरोधात हे उपोषण आज सकाळी सुरु करण्यात आले आहे
मुख्यमंत्री,गृहमंत्री,यांच्यासह पोलीस महासंचालक,पोलीस अधिक्षक यांना हे निवेदन पाठवण्यात आले आहे उपोषणकर्ते ऍड सुमित बोरुडे यांनी पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले असून त्याची चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
भ्रष्टाचाराच्या रकमेबाबत पोलिसांनी रेटकार्ड लावावे या मागणीसाठी तरुणाचे उपोषण
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १२, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १२, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: