एमआयडीसीचे स्वप्न खरच पूर्ण होणार कि पुन्हा ठरणार मृगजळ?


प्रशासक न्यूज,दि.६फेब्रुवारी
विशाल अ चव्हाण

लोकसभा निवडणुक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे त्यानंतर लगेच विधानसभा निवडणुका होणार आहेत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी काही दिवसच उरलेले असताना आज श्रीगोंदेकरांच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या आणि वर्षानुवर्षे रखडलेल्या एमआयडीसीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे

आमदार बबनराव पाचपुते,विक्रमसिंह पाचपुते,प्रतापभैय्या पाचपुते,खासदार डॉ सुजय विखे यांनी आज दुपारी ऑनलाईन पत्रकार परिषद घेत श्रीगोंदा तालुक्यात एमआयडीसी होण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती दिली

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी परिसरात पर्वतवाडी व महादेववाडी येथील शेतकरी विकास महामंडळाची ६१८एकर जमीन ही औद्योगिक वापरासाठी देण्याचा निर्णय आज मुंबईत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला उद्योगमंत्री ना.उदय सामंत व खासदार डॉ सुजय विखे यांनी या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली या बैठकीसाठी आमदार बबनराव पाचपुते,विक्रमसिंह पाचपुते,प्रतापसिंह पाचपुते यांच्यासह महसूल विभागाचे अप्पर सचिव राजगोपाल देवरा,नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,अ नगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजीत माने,एमआयडिसीचे मुख्यकार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा हे उपस्थित होते

येत्या दोन दिवसात ही जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरु होईल असे खासदार डॉ सुजय विखे यांनी सांगितले निवडणुकीच्या आधी होत असलेली ही घोषणा फक्त राजकीय ठरणार कि खरच एमआयडीसी होणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यावर उत्तर देताना आम्ही पुराव्यानिशी काम करतो आमच्यावर विश्वास ठेवा असे विखे यांनी सांगितले तसेच या आधी अनेकवेळा एमआयडीसी होणार असल्याच्या घोषणा झाल्या पण त्या फक्त राजकीय घोषणाचं ठरल्या त्यामुळे जनतेचा आता विश्वास राहिलेला नाही तसेच औटेवाडी येथे कृषी महाविद्यालय मंजूर झाले होते परंतु ते जामखेड तालुक्यात गेले याबाबत आणि श्रीगोंद्यात उपजिल्हा रुग्णालयाला जागा मिळत नसल्याबाबत प्रश्न विचारला असता डॉ सुजय विखे यांनी सांगितले कि यावेळी आम्ही एमआयडीसी करून दाखवू पण त्यासाठी लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हांला परत निवडून द्यावे उपजिल्हा रुग्णालयाला शासकीय जमीन आचारसंहिता लागण्याच्या आत मिळवून देऊ आणि नुसते मिळवून देणार नाही तर पुरावा म्हणून त्याचा कागद आपण पत्रकारांना देऊ असे देखील खासदार विखे यांनी सांगितले तर कृषी महाविद्यालय श्रीगोंद्यात होण्यासाठी येत्या काही दिवसात आपण प्रयत्न करू पण त्यात तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे वेळ लागेल असे उत्तर विक्रमसिंह पाचपुते यांनी दिले

*साकाळाई सर्वेक्षणासाठी ७१९कोटी रुपये मंजूर*
साकळाई योजना पूर्ण करू असा आपण शब्द दिला होता त्याबाबत खासदार विखे यांना विचारले असता साकळाई योजना नक्की होईल त्याच्या सर्वेक्षणासाठी ७१९ कोटी मंजूर झाल्याची माहिती विखे यांनी पत्रकारांना दिली

*श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या मनात मात्र संभ्रम*
श्रीगोंदा तालुक्यात आर्थिक विकास होण्याच्या दृष्टीने व रोजगार निर्माण होण्यासाठी एमआयडीसी होणे गरजेचे आहे परंतु आतापर्यत या एमआयडीसी वरून अनेकदा राजकारण झालं अनेक घोषणा झाल्या तालुक्याच्या विविध भागात एमआयडीसी मंजूर झाल्याचे या आधी अनेकदा लोकप्रतीनिधीकडून सांगण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात एमआयडीसी ही श्रीगोंदेकरांसाठी मृगजळच ठरलेली आहे परंतु आज एमआयडिसीला फक्त तत्वतः मान्यता मिळालेली आहे आता काही दिवसात आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे या भागात प्रत्यक्ष एमआयडीसी होण्यासाठी मात्र काही वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे हेही तेवढंच सत्य

*आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष*
आज आमदार पाचपुते यांचे श्रीगोंद्यातील निवसस्थानी झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेसाठी भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी,नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विक्रम पाचपुते यांनी एमआयडीसीला मान्यता मिळाल्याचे जाहीर करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाके फोडत एकमेकांना पेठे भरवत एकच जल्लोष केला
एमआयडीसीचे स्वप्न खरच पूर्ण होणार कि पुन्हा ठरणार मृगजळ? एमआयडीसीचे स्वप्न खरच पूर्ण होणार कि पुन्हा ठरणार मृगजळ? Reviewed by Prashasak on फेब्रुवारी ०६, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.