प्रशासक न्यूज,दि.६फेब्रुवारी
श्रीगोंदा शहरात सध्या सगळे नियम पायदळी तुडवून मोठ्या आवाजात दिवसरात्र डीजे वाजत आहेत लग्नसमारंभ,मिरवणूका,वाढदिवस यासाठी मोठ्या आवाजाचे डीजे लावले जातात पण या डीजेच्या आवाजामुळे श्रीगोंदा शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेकदा तक्रारी करुनसुद्धा पोलीस कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे
दोन दिवसांपूर्वीच शहरातील एका मंगल कार्यालयाबाहेर एका विवाहसोहळ्यात दोन डीजे लावण्यात आले होते या डीजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले होते लोकांच्या घरातील भांडी पडत होते काहींच्या घरात या आवाजामुळे घराची माती हादरे बसून खाली पडत होती या आवाजाबाबत एका जबाबदार नागरिकाने त्याठिकाणी जाऊन आवाज कमी करण्याची सूचना केली परंतु तेथील काही टवाळखोरांनी त्या जेष्ठ नागरिकासोबत हुज्जत घालून आवाज कमी न करता तसाच डीजेचा दणदनाट सुरु ठेवला त्यानंतर काही जबाबदार लोकांनी ११२ वर संपर्क साधून तक्रार केल्यानंतर पोलीस त्याठिकाणी आले त्यांनी त्यातील एक डीजे पोलीस स्टेशनला नेवून त्याच्यावर कारवाई केली
परंतु इतर दिवशी शहरात वाजणाऱ्या या डीजेच्या आवाजावर लगाम घालण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत होती काही दिवसांपूर्वी माजी नगराध्यक्ष नंदकुमार बोरुडे यांनी या डिजेवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस,महसूल तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देखील कारवाई बाबत पत्रव्यवहार केला होता परंतु त्यानंतर सुद्धा पोलीस ऍक्शन मोड मध्ये दिसून आले नाहीत
डीजे वाल्यांवर पोलीस कुठलीच कारवाई करत नसल्यामुळे सोशल मीडियावर देखील नाराजी व्यक्त होत होती न्यायालयाच्या निर्देशनुसार रात्री दहा वाजल्यानंतर वाद्य वाजवण्यास बंदी असूनसुद्धा शहरात रात्री अकरा वाजले तरी बिनधास्तपने डीजे सुरु असतात याबाबत नागरिकांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे
*डीजे आणि कार्यालय चालकांना बैठकीत सक्त सूचना*
डीजेच्या आवाजावर कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे सगळीकडून टिकेची झोड उठल्यानंतर अखेर श्रीगोंदा पोलिसांनी काल शहरातील डीजे चालक मालक व कार्यालय चालक मालक यांची बैठक घेत त्यात त्यांना कडक सूचना करण्यात आल्या यामध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री दहा नंतर कुणीच डीजे वाजवायचा नाही वाजवल्यास थेट गुन्हे दाखल करणार,आवाजाची मर्यादा न पाळल्यास कडक कारवाई करणार,कार्यालय मालकांनी सुद्धा त्यांच्या कार्यालयात डीजे आल्यावर त्याआधी त्या डीजे चालकाला पोलीस स्टेशनला पाठवून रीतसर परवानगी घ्यावी,आवाज कमी ठेवण्याबाबत डीजे ला सूचना करावी अश्या अनेक सूचना या बैठकीत पोलिसांनी केल्या असून आता थेट गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी सांगितले
आक्षेपार्ह गाण वाजवल्यास कडक कारवाई
कुठल्याही डीजे वाल्याने सामाजिक तेढ निर्माण होईल असं गाणं वाजवल्यास त्याला आता थेट जेलची हवा खावी लागणार आहे त्यामुळे कोणतेही वादग्रस्त गाणं वाजवण्यास पोलिसांनी मनाई केली आहे
आता आवाज नको वाढवू डीजे नाहीतर तुला ----पोलिसांचा ईशारा
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी ०६, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी ०६, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: