---आणि म्हणून पत्नीनेच काढला आपल्या पतीचा काटा!फिर्यादीच निघाली आरोपी


प्रशासक न्यूज,दि.३फेब्रुवारी

एका २६ वर्षीय विवाहित तरुणाची त्याच्या राहत्या घरी कोयत्याने गळा चिरून निर्दयीपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ या गावात दि.३०जानेवारी रोजी मध्यरात्री घडली होती ही हत्या घडल्यानंतर संपूर्ण परिस्थिती पाहाता प्रकरण वेगळंच असल्याचा संशय येत होता कारण पत्नी समोर चार अनोळखी लोकांनी येऊन हत्या केल्यामुळे आणि घरात कोणत्याही प्रकारची चोरी झालेली नसल्यामुळे कुठेतरी पाणी मूरतय असा संशय पोलिसांना होताच त्या दृष्टीने बेलवंडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी संयुक्तरित्या या खुनाच्या तपासाला सुरुवात केली

आणि आपल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकाराच्या मदतीने खून केल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला

*नेमके काय होते प्रकरण*
योगेश शेळके रा कोथूळ वय २६ या तरुणाची ३०जानेवारी रोजी रात्री खून केल्याची घटना घडली होती याबाबत मयताची पत्नी आरती शेळके हिने बेलवंडी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून चार अनोळखी इसमानविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला कर्जत पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी एलसीबीचे पो उप नि तुषार धाकराव,सहायक फौ बबन मखरे,पो हे कॉ बापूसाहेब फ़ोलाने,रवींद्र कर्डीले,पो ना फुरकान शेख,पो कॉ रवींद्र घुगांसे,मच्छिन्द्र बर्डे,अमोल कोतकर,भाऊसाहेब काळे,रोहित मिसाळ,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड,अतुल लोटके,गणेश भिंगारदिवे,देवेंद्र शेलार,आकाश काळे,म पोना भागश्री भिटे,सोनाली साठे,ज्योती शिंदे,उमाकांत गावडे,संभाजी कोतकर,व भरत बुधवंत अशी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची २विशेष तपास पथके तयार करून या प्रकरनाचा सखोल तपास सुरु केला

तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूला विचारपूस केली या तपासात त्यांचा फिर्यादी व मयताची पत्नी आरती हिच्यावरच संशय बळावला परंतु घटनेला कोणताही आधार मिळत नसल्यामुळे पोलिसांनी नेहमी मयताचे सोबत दारु पिणारे व मयताच्या घरी येणंजाण असलेल्या चार टे पाच इसमाना ताब्यात घेतले त्यानंतर फिर्यादी आरती हिनेसुद्धा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचा यात समावेश असल्याचे सांगून तपास पथकाची दिशाभूल केली होती

पण पोलिसांच्या चाणक्ष नजरेला हे पटत नव्हते त्यांना काहीतरी खटकत होते मग त्यांनी दोन दिवस कोथुळ गावातून माहिती गोळा केली तसेच तांत्रिक विश्लेष्णात घटनेच्या दिवशी सकाळी मयताचा भाचा शुभम लगड याच्या मोबाईलवर रोहित साहेबराव लाटे वय २३ रा कोथुळ हल्ली मुक्काम पुणे याचा फोन आल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पथकाने पुणे येथे जाऊन रोहित लाटे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची पोलिसांना कबुली दिली

मयत योगेश यांची पत्नी आरती व आपले प्रेमसंबंध आहेत याची कुणकुण आरतीचा पती मयत योगेश ह्याला लागली होती आरती व रोहित यांच्यातील अनैतिक संबंधाच्या संशयावरून आरतीचा पती योगेश हा आरतीला नेहमी दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करत होता त्यामुळे या दोघांनी योगेश चा काटा काढण्याचा निर्णय घेतला

*असा शिजला हत्येचा कट*
आपल्या प्रेमसंबधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय आरती व रोहित या दोघांनी घेतला हत्येच्या १५ दिवस आधीपासून या हत्येचा कट शिजला त्यासाठी रोहित याने पुण्यातील इसम अनिश सुरेंद्र धडे वय १९ याच्या मध्यस्थीने पृथ्वीराज अनिल साळवे वय १९,विराज सतीश गाडे वय १९,शोएब महंमद बादशाह वय २२,आयुष शंभू सिंह वय १८ यांना या हत्येसाठी दीड लाख रुपये देण्याचे कबूल केले त्यानुसार हत्येच्या दिवशी दोन दुचाकीवरून येऊन या सर्वानी योगेश यांचा खून केल्याचे रोहितने पोलिसांना सांगितले

*प्रेमसंबंधा बाबत कुणाला समजू नये म्हूणन ही आयडिया*
इतर सोशल मीडिया ऍपवरून एकमेकांशी संवाद साधल्यास तो सहज कुणाच्या लक्षात येईल त्यामुळे कायम वापरात असलेले सोशल मीडिया ऍप ना वापरता आपल्यातल्या या अनैतिक प्रेमसंबधाची कुणाला खबर लागू नये म्हणून आरती व रोहित हे दोघे संपर्क साधण्यासाठी स्नॅपचॅट या सोशल मीडिया ऍपचा वापर करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे

*गुन्हेगार १८ ते २० वर्ष्याचे तरुण*
एवढ्या निर्दयी पणे हत्या करणारे गुन्हेगार हे सर्व १८ ते २० वर्ष्याचे आहेत हे विशेष एवढ्या लहानपणात एवढे धाडस यांच्यात कुठून येते असा सवाल या घटनेच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे आणि  एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न बघणाऱ्या रोहित आणि आरती या दोघांना त्यांचे अक्ख आयुष्य जेलमध्ये घालवावं लागणार आहे हेही खरं

या गुन्ह्यातील आरती योगेश शेळके वय २६,रोहित साहेबराव लाटे वय २३ यांच्यासह वरील सर्व आरोपी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले असून त्यांना बेलवंडी पोलीस स्टेशनला हजर केले आहे पुढील तपास पोलीस करत आहेत


---आणि म्हणून पत्नीनेच काढला आपल्या पतीचा काटा!फिर्यादीच निघाली आरोपी ---आणि म्हणून पत्नीनेच काढला आपल्या पतीचा काटा!फिर्यादीच निघाली आरोपी Reviewed by Prashasak on फेब्रुवारी ०२, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.