धारधार शस्त्राने गळा चिरून तरुणाचा खून!श्रीगोंदा तालुक्यातील खळबळजनक घटना


प्रशासक न्यूज,दि.३०जानेवारी

३५वर्षीय तरुणाचा त्याच्या राहत्या घरी धारधार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ शिवारात घडली आहे

योगेश सुभाष शेळके वय ३५ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे खून कोणत्या कारणाने झाला याबाबत अजून काही माहिती समजली नाही आज मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास तोंड बांधून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी योगेश शेळके यांचा त्यांच्या राहत्या घरी खून केल्याची माहिती समजली आहे बेलवंडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे या खुनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे

बेलवंडी पोलीस स्टेशनला हजर झालेले पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्यापुढे या खुनाचा तपास करण्याचे आवाहन असणार आहे
धारधार शस्त्राने गळा चिरून तरुणाचा खून!श्रीगोंदा तालुक्यातील खळबळजनक घटना धारधार शस्त्राने गळा चिरून तरुणाचा खून!श्रीगोंदा तालुक्यातील खळबळजनक घटना Reviewed by Prashasak on जानेवारी २९, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.