प्रशासक न्यूज,दि.२८जानेवारी
पन्नास रु किलो कांदा असताना एका गोणीला तीन हजार रुपये मिळत होते आता कांदा दहा रुपये किलो झाला एका गोणीला ५००च रुपये मिळत आहेत एका गोणी पाठीमागे अडीच हजार रुपये तोटा झाला १०० गोणी वाल्या शेतकऱ्याचा अडीच लाख रुपये तोटा झालाय मग सांगा साहेब तुमची ही साखर आणि डाळ किती पैश्यांची असा संतप्त सवाल श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील शेतकरी संपतराव शितोळे यांनी उपस्थित केला
भानगाव येथे आज साखर व डाळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी भाजपचे विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक उपस्थित होते यावेळी भाषण करताना शितोळे यांनी शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करत याबाबत खासदार व आमदार यांनी लोकसभेत,विधानसभेत आवाज उठवायला हवा असे मत व्यक्त करत तुम्ही आमच्या भावना खासदारांपर्यत पोहोचवा असे विक्रमसिंह पाचपुते यांना सांगितले शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत असताना उपस्थित लोकांनी देखील त्यांना टाळ्या वाजवून चांगलाच प्रतिसाद दिला
कांदा व इतर शेतमालाला बाजारभाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून त्यापुढे ही तुमची साखर आणि डाळ ती काय कामाची किती रुपयांची असा सवाल उपस्थित करून या शेतकऱ्याने सरकार बद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली
चौकट/-खासदारांची कार्यक्रमाकडे पाठ
या कार्यक्रमासाठी खासदार डॉ सुजय विखे उपस्थित राहणार होते परंतु त्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली शेतकऱ्यांच्या या संतप्त प्रतिक्रियांमुळेच खासदारांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा मात्र या भागात रंगली होती
चौकट/-सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
ही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून कष्टकरी शेतकऱ्यांच्या व्यथा थेट जाहीर कार्यक्रमात मांडल्यामुळे या शेतकऱ्याचे कौतुक होत आहे
सांगा साहेब तुमची साखर आणि डाळ किती पैश्यांची!श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्याचा संतप्त सवाल
Reviewed by Prashasak
on
जानेवारी २८, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
जानेवारी २८, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: