बिबट्याचा मुक्तसंचार याच गावात पुन्हा बिबट्याचे दर्शन!वनविभागाला जाग येणार तरी कधी?


प्रशासक न्यूज,दि.२८जानेवारी

श्रीगोंदा तालुक्यात सध्या बिबट्यांचा मुक्त वावर सुरु असल्याचे पाहायला मिळत असून वनविभाग मात्र याकडे डोळेजाक करत असल्यामुळे लोकांमध्ये वनवीभागाबद्दल तीव्र नाराजी आहे तालुक्यातील वडाळी गावात सध्या बिबट्याचा मुक्त संचार पहायला मिळत आहे आज दि.२८ रोजी रात्री आठ वाजता वडाळी गावातील डांगेमळा परिसरात महेश डांगे यांना हा बिबट्या दिसला असून त्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये या बिबट्याचे चित्रीकरण केले आहे

महेश डांगे हे त्यांच्या चारचाकी गाडीतून शेतातून घराकडे जात असताना त्यांना हा गाडीच्या लाईट मध्ये त्यांना हा बिबट्या दिसला या आधी काही दिवसांपूर्वीच वडाळी गावात गावाकऱ्यांच्या मागणीनुसार वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला होता परंतु तो नर बिबट्या होता मादी बिबट्या व तिची पिल्ले या भागात फिरत असल्याचे गावाकऱ्यांचे म्हणणे होते परंतु ती मादी बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने कुठली ठोस पाऊल उचलली नसल्याचे गावाकऱ्यांचा आरोप आहे त्यातच आज हा बिबट्या दिसून आल्यामुळे गावाकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे

दोन दिवसांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात अजनूज येथील महिला गंभीर जखमी झाली होती तर आठ दिवसांपूर्वी याच गावात एका तीन वर्ष्याच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता त्यामुळे आता वनविभागाने वेळकाढुपणा न करता मुक्तपणे फिरत असलेले हे बिबट जेरबंद करण्यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत
बिबट्याचा मुक्तसंचार याच गावात पुन्हा बिबट्याचे दर्शन!वनविभागाला जाग येणार तरी कधी? बिबट्याचा मुक्तसंचार याच गावात पुन्हा बिबट्याचे दर्शन!वनविभागाला जाग येणार तरी कधी? Reviewed by Prashasak on जानेवारी २८, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.