पुन्हा बिबट्याचा हल्ला,एकाच आठवड्यात दुसरी घटना,वनविभाग नेमक करतंय काय?



प्रशासक न्यूज,दि.२७जानेवारी

श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज गावच्या शिवारात मागच्या आठवड्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका तीन वर्ष्याच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला होता ही घटना होऊन आठवडा देखील उलटलेला नसतानाच याच गावातील म्हसोबावाडी रस्त्यावरील कुरणामध्ये काल दि.२६ रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे
जखमी झालेली महिला ही कोळसा पडण्याच काम करत होती ती राहत असलेल्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला यात ती जखमी झाली एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा एकाच गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे परंतु असे असतानासुधा वनविभाग नेमक काय करतोय याचाच प्रश्न आता पडलेला दिसतोय वारंवार वनविभागाला बिबट्याचा वावर असल्याचे सांगुनसुद्धा वनविभाग याकडे डोळेजाक करत आहे याबाबत गावाकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून आतातरी वनविभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी तात्काळ पाऊल उचलणे गरजेचे आहे
पुन्हा बिबट्याचा हल्ला,एकाच आठवड्यात दुसरी घटना,वनविभाग नेमक करतंय काय? पुन्हा बिबट्याचा हल्ला,एकाच आठवड्यात दुसरी घटना,वनविभाग नेमक करतंय काय? Reviewed by Prashasak on जानेवारी २६, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.