श्रीगोंद्यात उद्या रंगणार भव्य राज्यस्तरीय जंगी कुस्त्यांचा सामना,नामवंत मल्लांची हजेरी!


प्रशासक न्यूज,दि.२५जानेवारी

श्रीगोंदा शहरात उद्या शुक्रवार दि.२६ रोजी दुपारी दोन ते रात्री साडे नऊ या वेळेत भव्य राज्यस्तरीय निकाली जंगी कुस्त्यांचा सामना रंगणार आहे शहरातील पारगाव रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या मैदानात या कुस्त्यांच्या सामन्यांचा थरार रंगणार आहे

पै.आप्पासाहेब सोनवणे मित्र मंडळ व माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबीरे मित्र मंडळाच्या वतीने या सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून यात पै.सिकंदर शेख(महाराष्ट्र केसरी),पै.पृथ्वीराज पाटील(महाराष्ट्र केसरी),पै.शिवराज राक्षे(डबल महाराष्ट्र केसरी),पै.माऊली जमदाडे(महान भारत केसरी),पै.बाला रफिक शेख(महाराष्ट्र केसरी),पै.किरण भगत(उप.महाराष्ट्र केसरी),पै.विष्णू खोसे(युवा महाराष्ट्र केसरी)या महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीपटूनसह पै देवा थापा(नेपाळ),पै.सोनू कुमार(पंजाब केसरी),पै.बंटी कुमार(हरियाणा),पै.अमित लाखा(हरियाणा)असे परराज्यातील नामवंत मल्ल देखील या सामन्यासाठी उपस्थित राहणार आहेत

उद्या या ठिकाणी या पुरुष कुस्तीपटूनसह महिला मल्लांमध्ये देखील कुस्तीचा सामना रंगणार असून यामध्ये पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरलेली पै भाग्यश्री फंड,पै निशा तोमर(हरियाणा),पै.धनश्री फंड,पै.शृंखला रत्नपारखी,पै.वैष्णवी तोरवे,पै.आयशा शेख अश्या महिला कुस्तीपट्टूंचा देखील कुस्तीचा सामना रंगणार आहे

तसेच बालकुस्तीपटू पै.निखिल माने,पै.शंभू सूर्यवंशी,पै.अतुल जाधव,पै ऋषिकेश वायकर असे लहान मुलांचे देखील कुस्तीचे सामने उद्या या मैदानावर संपन्न होणार आहेत प्रसिद्ध कुस्ती निवेदक प्रशांत भागवत सर(बारामती),व युवराज सोलनकर(कर्जत)हे या कुस्तीच्या सामन्यांचे निवेदन करणार आहेत तर या कुस्तीच्या सामन्यांचे पंच म्हणून पै.दीपक सोनवणे,पै.नंदू रेपाळे,पै.विष्णू राऊत,पै.नाना सोनवणे,पै.संजय डफळ सर,हनुमंत फ़ंड,नितीन मोरे हे कामकाज पाहणार आहेत

आ बबनराव पाचपुते,माजी आमदार राहुल जगताप,जेष्ठ नेते बाबासाहेब भोस,काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे,घनश्याम शेलार,राज्य बाजारसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब नाहटा,खा.सुजय विखे,नगराध्यक्षा शुभांगी पोटे,गटनेते बापुशेठ गोरे यांच्यासह सर्व नगरसेवक व तालुक्यातील राजकीय नेते,कार्यकर्ते तसेच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले,तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता या सामन्यांचे उदघाट्न होणार आहे या सामन्यांसाठी चांडाळ चौकडीच्या करामती फेम गणेश आण्णा लोणकर पाटील यांच्यासह टायगर ग्रुपचे अध्यक्ष पै.तानाजी जाधव,पै अनिकेत घुले,पै.भैय्यासाहेब बंडगर,पै.संजूभाऊ खंडागळे हे उपस्थित राहणार आहेत

खेळ मातीतला या फेसबुक व युट्युब च्यानेल वरून या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे या सामन्यांसाठी मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक आप्पासाहेब सोनवणे व नानासाहेब कोथिंबीरे यांनी केले आहे

चौकट/-कुस्तीच्या खेळाला वैभव मिळवून देण्यासाठी सामान्यांचे आयोजन/-कुस्ती स्पर्धा आयोजक पै.आप्पासाहेब सोनवणे,नानासाहेब कोथिंबीरे
कुस्ती हा खेळ दिवसेंदिवस लोप पावत चालला आहे तरुणांमध्ये या खेळाची गोडी लागावी या खेळाला वैभव प्राप्त व्हावे या हेतूने या राज्यस्तरीय कुस्तीच्या सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहे मागील वर्षी देखील याच भावनेतून अशीच राज्यस्तरीय कुस्तीस्पर्धा आयोजित केली होती कुस्ती सामन्यांचे हे दुसरे वर्ष आहे तरुण पिढीला यातून व्यायामाची आवड निर्माण होईल आणि जास्तीत जास्त तरुण कुस्तीखेळाकडे आकर्षित होतील या हेतूने हे आयोजन केलेले आहे
श्रीगोंद्यात उद्या रंगणार भव्य राज्यस्तरीय जंगी कुस्त्यांचा सामना,नामवंत मल्लांची हजेरी! श्रीगोंद्यात उद्या रंगणार भव्य राज्यस्तरीय जंगी कुस्त्यांचा सामना,नामवंत मल्लांची हजेरी! Reviewed by Prashasak on जानेवारी २५, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.