नागवडे कुटुंबाच्या मागे पूर्ण ताकतीने उभे राहणार-उपमुख्यमंत्री अजित पवार



प्रशासक न्यूज,दि.१९जानेवारी

स्व.शिवाजीराव नागवडे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने विविध क्षेत्रात ठसा उमटवला श्रीगोंदा तालुक्याच्या विकासात स्व.बापूंचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या पश्चात राजेंद्र नागवडे अनुराधा नागवडे व दीपक नागवडे हे बापूंचा राजकारण आणि समाजकारणाचा वारसा चांगल्या पद्धतीने चालवत आहेत इथून पुढच्या काळात नागवडे कुटुंबाच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभे राहू असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले
स्व.शिवाजीराव नागवडे यांच्या ९०व्या जयंती सोहळ्यानिमित्त श्रीगोंदा कारखान्यावर आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी स्व.बापूंच्या आठवणींना उजाळा देतानाच बापूंचे एखाद्या अभियांत्याला देखील लाजवेल असे कारखान्याबाबत असलेले ज्ञान त्यांचा सरपंच पदापासून,ते राज्याच्या साखर संघाच्या अध्यक्ष पदापर्यतचा राजकीय प्रवास,तालुक्याच्या विकासासाठी असलेले योगदान अश्या विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला

यावेळी बोलताना मी सत्तेला हपापलेला कार्यकर्ता नाही असे सांगतानाच ना पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कामाचे कौतुक करत त्या दोघांमुळेच मला महायुती सरकार मध्ये काम करण्याची संधी मिळाली असे आवर्जून सांगित त्या दोघांचे आभार मानले तसेच मोठं काम करण्यासाठी धाडस करावं लागत मोठं काम काढलं कि भ्रष्टाचाराचे आरोप होतात म्हणून मोठी कामे करायची नाही असे नाही मोदींनी ते धाडस केल म्हणूनच ब्रिटिश कालीन पार्लमेंट नव्या स्वरूपात उभी राहिली आज मोदींनी सोलापुरात १५हजार घरांच वाटप केल त्याचे तोंड भरून कौतुक करतानाच १९८५सालापासून सहकारी कारखान्यांना आकारलेले ९,५००हजार कोटींच्या प्राप्ती करातून अमित शहानी सूट देऊन कारखानदारांना मोठा दिलासा दिल्याचे आवर्जून पवार यांनी सांगितले
नगर जिल्हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील--अजित पवार यांनी माझं आजूळ नगर जिल्ह्यातील असल्यामुळे या जिल्ह्यातील राजकारण मी जवळून पहिलय असं सांगताना या जिल्ह्याने राज्याचे नेतृत्व करणारे नेते राज्याला दिल्याचे सांगत पदमश्री विखे पाटलांनी संपूर्ण देशासह तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना सुद्धा सहकार काय असते ते दाखवून दिले असे सांगितले
चालुवर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती-मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे यंदा पाण्याची परिस्थिती बिकट झाली आहे पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगत कालव्यांच्या नूतनिकरणासाठी १४हजार कोटींची तरतूद केल्याचे पवार यांनी सांगितले तसेच कालवा सल्लागार समितीचा प्रमुख या नात्याने आपण सर्व लोकप्रितिनिधी कारखान्याचे चेअरमन यांना विश्वासात घेऊन पाण्याचे नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले
राजकारणात वाचळवीरांची संख्या वाढली रोज दहा वाजता भोंगा वाजतो--अलीकडच्या राजकारणात वाचळविरांची संख्या वाढली असून रोज सकाळी दहा वाजता भोंगा वाजतो असे सांगत त्यांनी नाव न घेता संजय राऊत यांच्यावर टीका केली
महिला बचतगटाना मोठी मदत करणार-इथून पुढच्या काळात राज्य सरकार महिला बचत गटाना मोठी मदत करणार असून त्यांनी तयार केलेल्या वस्तूना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी गाळे उभे करणार,महिला भवन उभे करणार असे सांगून त्यासाठी डीपीसीला जास्त निधी देणार असल्याचे सांगितले
कारखान्यांना हार्वेस्टर साठी अनुदान देणार--कारखानदारणाच्या समस्या लक्षात घेऊन इथून पुढच्या काळात कारखानदारणा हार्वेस्टर मशीन घेण्यासाठी सरकार अनुदान देणार असे सांगत किती दिवस ऊसतोड मजुरांनी ऊस तोडायचा त्यांनी देखील त्यांचा स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे असे मत ना.पवार यांनी यावेळी व्यक्त केले
मराठा आरक्षणाला विरोध नाही पण काहीजण ऐकत नाहीत--मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण संविधानाचा आदर करत कायदेशीर टिकणारे आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यासाठी काहींनी समजूतदारपणा दाखवणे गरजेचे आहे पण ते समजूतदारपणा दाखवत नाहीत असे त्यांनी सांगितले तसेच ओबीसी,आदिवासी यांच्या आरक्षणाला कसला धक्का लागू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले
चौकट/-उमेदवारी बाबत थेट बोलण टाळलं
अजित पवार आज विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर काहीतरी सूचक वक्तव्य करतील अशी सर्वांनाच अपेक्षा असतानाच पवार यांनी मात्र याबाबत आज कुठलेच वक्तव्य न केल्यामुळे उपस्थितांचा भ्रमनिरास झाला

यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना राजेंद्र नागवडे यांनी मागच्या विधासभेला आम्ही उमेदवारी करावी असे सर्व जनतेची अपेक्षा असतानासुधा आम्ही उमेदवारी केली नाही त्याबाबत मी सर्वांची माफी मागतो परंतु या वेळी मात्र विधासभेची उमेदवारीअनुराधा नागवडे करणार असल्याचे ठामपणे सांगत तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर राहू द्या असे देखील त्यांनी अजित पवार यांना सांगितले तसेच बापूंच्या कामाची माहिती देतानाच कोविड काळात तालुक्यातील ग्रामपंचायतीना आर्थिक मदत नागवडे साखर कारखाना हा एकमेव सहकारी कारखाना असल्याचे सांगतानाच नागवडे कुटुंबंने कधी कुणाला त्रास दिला नाही,शेतकरी कामगारांशी गद्दारी केली नाही सत्ता नसतानसुधा जनतेची कामे केली भविष्यात तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचे त्यांनी कौतुक केले

यावेळी बोलताना आमदार बबनराव पाचपुते यांनी स्व बापूंसोबत राजकीय वैर असले तरी मनभेद कधी झाले नाहीत बापू हे वैचारिक दृष्ट्या परफेक्ट नेते होते असे देखील पाचपुते यांनी सांगत अजित पवार यांनी निवडणूक झाल्यावर सरकार स्थापनेचा प्रयत्न केला पण तो फसला दोनवेळा त्यांची संधी हुकली पण अजित पवार जे धाडसी नेते आहेत त्यांच्या धाडसी स्वभावामुळे त्यांना पुन्हा संधी मिळाली असे सांगत त्यांनी यावेळी पवार यांच्या कामाचे कौतुक केले
कोरोना काळात अडचण झाली पण आता सर्व ठीक आहे जोमाने कामाला लागणार--कोरोना काळात माझी जरा गडबड झाली पण आता सर्व ठीक झाले असून इथून पुढे खूप कामे करायची आहेत नवीन जोमाने काम करणार उभारी धरून काम करणार असे पाचपुते यांनी सांगत विधासभेला सज्ज असल्याचे सुतोवाच केले

प्रस्तावकीय भाषणात जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी बापूंच्या कार्याचा लेखाजोखा मांडत बापूंच्या कामाचे कौतुक केले

चौकट/-काँग्रेसचे नेते कार्यक्रमापासून दूर
राजेंद्र नागवडे हे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आहेत तर त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे या महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत असे असून सुद्धा जिल्ह्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे नेते या कार्यक्रमापासून दूर असेल्याचे दिसले

या कार्यक्रमासाठी आ संग्राम जगताप,आ निलेश लंके,माजी आमदार रमेश थोरात,राज्य बाजारसमिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहटा,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड,शिवसेना तालुकाध्यक्ष बाळासाहेब दुतारे,नगराध्यक्षा शुभांगी पोटे,उपगराध्यक्षा ज्योती खेडकर,अनिल पाचपुते,भगवानराव पाचपुते,कैलास पाचपुते,नगरसेविका सीमा गोरे यांच्यासह कारखान्याचे संचालक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
नागवडे कुटुंबाच्या मागे पूर्ण ताकतीने उभे राहणार-उपमुख्यमंत्री अजित पवार नागवडे कुटुंबाच्या मागे पूर्ण ताकतीने उभे राहणार-उपमुख्यमंत्री अजित पवार Reviewed by Prashasak on जानेवारी १९, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.