रामायण कथेच्या सोहळ्याला मुस्लिम बांधवांची पंगत!


प्रशासक न्यूज,दि.१८जानेवारी

विशाल अ चव्हाण

दि.२२ जानेवारीला आयोध्येत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठापण होणार आहे त्यामुळे देशातील वातावरण राममय झाले आहे त्याचेच औचित्य साधून शिवसेना(शिंदेगट)श्रीगोंदा तालुकाप्रमुख नंदकुमार ताडे यांनी श्रीगोंदा बाजारतळावर उभारलेल्या राममंदिरात देखील कलशरोहण आणि मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे
त्यानिमित्त सोमवार दि.१६पासून या मंदिरासमोर श्री तुलसी रामायण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या रामकथेच्या सप्ताहात आज श्रीगोंद्यातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने महाप्रसादाच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले आहे रामकथे साठी मुस्लिम बांधवानी दिलेल्या या पंगतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे तसेच आज होणाऱ्या या पंगतीचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन मुस्लिम बांधवांसह रामकथेच्या आयोजकांकडून केले जात आहे
धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना,देशातील हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून धार्मिक दंगली घडवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या समाजकंटकांना या माध्यमातून एक सनसणीत चपराक बसणार आहे संपूर्ण देशाने आदर्श घ्यावा असेच हे उदाहरण म्हणावे लागेल

संत शेख महंमद महाराज हे श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत आहे हिंदू मुस्लिम इथे कायम एकोप्याने राहतात या महाप्रसादाच्या पंक्तीमुळे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा एकोपा अजून दृढ होण्यास मदत होणार आहे.
रामायण कथेच्या सोहळ्याला मुस्लिम बांधवांची पंगत! रामायण कथेच्या सोहळ्याला मुस्लिम बांधवांची पंगत! Reviewed by Prashasak on जानेवारी १८, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.