उपमुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या सभेकडे सर्वांचे लक्ष!स्व.शिवाजीराव(बापू)नागवडे यांचा ९०वा जयंती सोहळा!
प्रशासक न्यूज,दि.१८जानेवारी
स्व.शिवाजीराव बापू नागवडे यांचा ९०वा जयंती सोहळा उद्या दि.१९ शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीगोंदा कारखान्यावरील इंदिरा गांधी विद्या निकेतन च्या प्रांगणात संपन्न होत आहे
नामदार अजित पवार यांच्यासह अनेक बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत महायुतीच्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांना देखील या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे या सोहळ्याच्या निमित्ताने राजेंद्र नागवडे हे एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करत विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही
उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार काय बोलणार,ते तालुक्यातील कार्यकर्त्यांना कोणता सल्ला देणार,नागवडे यांच्या विधानसभा उमेदवारी बाबत ते कुठली घोषणा करणार का?याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे त्यातच राजेंद्र नागवडे यांचे विश्वासू सहकारी आदेश नागवडे यांनी महायुतीच्या मेळाव्याला हजेरी लावत २४तारखेपर्यत वेट अँड वॉच असे सांगितल्यामुळे राजेंद्र नागवडे यांची इथून पुढची राजकीय भूमिका काय असणार याबाबत देखील सर्वांना उत्सुकता लागली आहेस्व.बापूंच्या जयंती सोहळ्यानिमित्त श्रीगोंद्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात स्व.शिवाजीराव बापू नागवडे प्रतिष्ठान व महाविद्यालयाच्या वतीने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दि.१६जानेवारी ते दि.२०जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे यात तीन दिवसीय व्याख्यानमालेसह वार्षिक स्नेहसंमेलन,शेतकरी मेळावा अश्या कार्यक्रमांचा समावेश आहे दि.२०जानेवारी रोजी पार्श्वगायक प्रशांत मोरे व काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक पारितोषिक वितरण झाल्यानंतर या महोत्सवाची सांगता होईल
उपमुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या सभेकडे सर्वांचे लक्ष!स्व.शिवाजीराव(बापू)नागवडे यांचा ९०वा जयंती सोहळा!
Reviewed by Prashasak
on
जानेवारी १८, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
जानेवारी १८, २०२४
Rating:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत: