दौंड-नगर रस्त्यावर पुन्हा अपघात,दुभाजकाचा मुद्दा ऐरणीवर


प्रशासक न्यूज,दि.१६जानेवारी

नगर दौंड महामार्गचे काम झाल्यापासून या रस्त्यावर सुरु झालेली अपघात मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत वाहन चालकांचा आतेतायीपणा,वाहतूकीच्या नियमांचे होणारे उल्लंघणं याच्यासोबतच आता या रस्त्याला नसलेले दुभाजक हे देखील या रस्त्याला वारंवार होणाऱ्या अपघाताचे कारण बनले आहे



श्रीगोंदा तालुक्यातील दौंड नगर रस्त्यावर घारगाव येथील खोमणेवस्ती नजिक एक दुधाचा टँकर व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला असून या दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातातील जखमीनबाबत मात्र माहिती समजू शकली नाही

या अपघाताबाबत बेलवंडी पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडुन देखील अपघाताबाबत नेमकी माहिती समजू शकली नाही परंतु दोन्ही वाहनाची अवस्था पाहता अपघाताची भीषणता लक्षात येते

त्यामुळे या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम पाळणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे या रत्यावरील मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक लक्षात घेते या रत्यावर तत्काळ दुभाजक बसवणे गरजेचे आहे
दौंड-नगर रस्त्यावर पुन्हा अपघात,दुभाजकाचा मुद्दा ऐरणीवर दौंड-नगर रस्त्यावर पुन्हा अपघात,दुभाजकाचा मुद्दा ऐरणीवर Reviewed by Prashasak on जानेवारी १५, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.