'या' नेत्याच्या विश्वासु सहकाऱ्याची 'त्या' मेळाव्याला हजेरी,राजकीय चर्चांना उधाण!


प्रशासक न्यूज,दि.१४जानेवारी
विशाल अ. चव्हाण

श्रीगोंदा तालुका हा नगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुका राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतं असतानाच श्रीगोंदा तालुका मग पाठीमागे राहणार कसा

चालुवर्षं हे निवडणुकांचे वर्ष आहे त्यामुळे नवीन वर्ष सुरु होताच तालुक्यातील राजकीय घडामोडीना देखील वेग आला आहे अ.नगर येथे आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजप,शिवसेना(शिंदे गट),राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट),प्रहार,आरपीआय अश्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता

या मेळाव्याला काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचे व नागवडे कुटुंबाचे घरातले असणारे विश्वासू सहकारी व नागवडे यांची राजकीय यंत्रणा सांभाळणारे आदेश नागवडे हे महायुतीच्या मेळाव्याला हजर राहिल्यामुळे आता वेगवेगळ्या राजकीय चर्चाना उधाण आले आहे आदेश नागवडे हे राजेंद्र नागवडे यांच्यावर नाराज आहेत? कि ही राजेंद्र नागवडे यांचीच कुठली राजकीय खेळी आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे

विशेष म्हणजे आज आदेश नागवडे यांच्यासोबत राजेंद्र नागवडे यांच्या गटाचे काही नवनिर्वाचित सरपंच आणि कार्यकर्ते देखील या मेळाव्याला उपस्थित असल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत

त्यातच येत्या १९जानेवारीला होत असलेल्या स्व शिवाजीराव नागवडे यांच्या ९०व्या जयंती सोहळ्यासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या नागवडे दांम्पत्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत नागवडे परिवाराकडून जरी यात कुठलेही राजकारण नसून अजित पवार हे उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना कार्यक्रमाला आमंत्रित केल्याचे सांगण्यात येत असले तरी यापाठीमागे अनेक राजकीय घडामोडी लपल्याचे राजकीय जानकारांचे म्हणणे आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यक्रमाचे दिलेले निमंत्रण आणि महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचे अत्यंत निकटवर्तीय  आणि विश्वासू असलेल्या आदेश नागवडे यांनी काँग्रेसच्या विरोधी असणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांसह आज लावलेली हजेरी हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही त्यामुळे येत्या काही दिवसात तालुक्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही

चौकट/-महायुतीच्या नेत्यांना आमंत्रण देण्यासाठी मेळाव्याला गेलो,२४तारखेला चित्र स्पष्ट होणार
महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहिल्याबाबत आदेश नागवडे यांना विचारले असता आपण १९तारखेच्या कार्यक्रमाचे महायुतीच्या नेत्यांना आमंत्रण देण्यासाठी गेलो होते असे राजकीय चौकटीतले उत्तर त्यांनी दिले त्यावर तुम्ही राजेंद्र नागवडे यांच्यावर नाराज आहात का असे विचारले असता तसे काही नसून येणाऱ्या 24 तारखेला सर्व चित्र स्पष्ट होईल असे म्हणून एक सूचक इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे आता २४तारखेला कोणती राजकीय घडामोड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

'या' नेत्याच्या विश्वासु सहकाऱ्याची 'त्या' मेळाव्याला हजेरी,राजकीय चर्चांना उधाण! 'या' नेत्याच्या विश्वासु सहकाऱ्याची 'त्या' मेळाव्याला हजेरी,राजकीय चर्चांना उधाण! Reviewed by Prashasak on जानेवारी १४, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.