श्रीगोंदा तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले/दोन दिवसात तिघांचा मृत्यू,तीन वर्ष्याच्या चिमुकल्याचाही समावेश
प्रशासक न्यूज,दि.१०जानेवारी
श्रीगोंदा तालुक्यात येत्या नवीन वर्ष्यापासून सुरु झालेले अपघातांचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे मागील दोन दिवसात काष्टी,पेडगाव चौक,(श्रीगोंदा)आणि वांगदरी ते ढोकराई फाटा रोड या तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे श्रीगोंदा तालुक्यात वाढलेले अपघाती मृत्यूचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे
दि.८जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वांगदरी येथील रवींद्र राजेंद्र पवार हे त्यांच्या तीन वर्ष्याचा मुलगा वेदांश रवींद्र पवार याच्यासह दुचाकीवरून वांगदरी ते ढोकराई रस्त्याने जात असताना समोर येत असलेल्या मोकळ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली ची पिन उसळून पडली त्यामुळे त्या ट्रॉलीची पवार यांच्या दुचाकीला धडक बसली त्यामुळे वेदांश हा चिमुरडा दुचाकी वरून उडून खाली पडला त्यावेळी त्याच्या अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्यामुळे तो गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला या घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे
तर याच दिवशी म्हणजेच सोमवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील काष्टी रस्त्यावर पेडगाव चौक येथे दुचाकीला पिकअप ने समोरून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात योगीराज दिलीप चाकणे वय-४१ रा.चांडगाव यांचा मृत्यू झाला आहे सदर घटनेबाबत विलास चाकणे यांच्या फिर्यादीवरून पीकअप चालक दीपक केशव गायकवाड रा. चांडगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तर काष्टी येथे नगर दौंड रस्त्यावर दुचाकी आणि टेंपो च्या झालेल्या अपघातात श्रीगोंद्यातील लोणकर नावाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे
चौकट/-वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपघाताला वाहन चालकांना कडून वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणे हे महत्वाचे कारण आहे दारू पिऊन वाहन चालवणे,अतिशय वेगात वाहन चालवणे,हयगयीने वाहन चालवणे अशा अनेक कारणांमुळे अपघात होत आहेत आणि यात लोक मरत आहेत त्यामुळे सर्वच वाहन चालकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे
श्रीगोंदा तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले/दोन दिवसात तिघांचा मृत्यू,तीन वर्ष्याच्या चिमुकल्याचाही समावेश
Reviewed by Prashasak
on
जानेवारी १०, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
जानेवारी १०, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: