'राहुलदादाच' विधानसभेचे उमेदवार


प्रशासक न्यूज,दि.१०जानेवारी

२०२४ नवीन वर्ष सुरु झाले आहे चालुवर्षी लोकसभा विधानसभा निवडणुका होत आहेत श्रीगोंदा तालुक्यात विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे एकाच पक्षाचे दोन दोन गट निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये फूट पडली आहे

तालुक्यात अजित पवार गट,शरद पवार गट,शिंदे गट, ठाकरे गट,काँग्रेस,भाजप,बीआरएस अश्या विविध पक्षात आणि गटात कार्यकर्ते,पदाधिकारी विखूरले गेले आहेत येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या गटाची कुणाला उमेदवारी मिळणार हे अजून गुलदस्त्यात आहे प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे

अनुराधा नागवडे,प्रतिभा पाचपुते,डॉ प्रणोती माई जगताप यांनी मागील काही दिवसांपासून आपला जनसंपर्क वाढवला आहे त्यामुळे येत्या काळात महिलांमध्येच लढत होणार अशी शक्यता असतानाच माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉ प्रणोती यांनी मात्र 'राहुल' दादा हेच विधानसभा लढवणार असल्याचे सर्व पत्रकारांसमोरच स्पष्ट केले

काल पिंपळगावपिसा येथे जगताप यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात डॉ प्रणोती यांनी बोलताना विधानसभा उमेदवारीबाबत स्पष्ट मत व्यक्त केले त्यांनी मी निवडणूक लढवणार नाही राहुलदादा हेच विधानसभा लढवतील असे जाहीर केले त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला प्रतिसाद देत दादा लढतील आणि नक्की जिंकतील सुद्धा असा विश्वास व्यक्त केला त्यामुळे डॉ प्रणोती या स्वतः उमेदवारी करणार नसल्या तरी त्यांनी आपले पती राहुलदादा यांना आमदार करण्यासाठी मात्र चंग बांधला असून त्यासाठी त्या मोठी मेहनत घेत आहेत तालुका पिंजून काढत आहेत

असे असले तरी २०१४ची निवडणूक व आता होणारी निवडणूक यात मोठी तफावत आहे तेव्हाची राजकीय परिस्थिती व आताची राजकीय परिस्थिती यात जमीन आसमान चा फरक आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राहुल जगताप यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे हे मात्र निश्चित

चौकट/-मी दोन्ही नेत्यांना मानतो,दोन्ही तालुकाध्यक्ष माझेच
मी शरद पवार व अजित पवार या दोन्ही नेत्यांना आधी पासून मानतो अजित पवार गटाचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सुद्धा माझेच असल्याचे राहुल जगताप यांनी सांगितल्यामुळे राजकीय जानकारांच्या भुवया उंचवल्या असून राहुल जगताप हे नेमके अजित पवार गटाचे की शरद पवार गटाचे याबाबत संभ्रम निर्माण झाला असून ते नेमके कोणत्या गटाकडून विधासभेला निवडणूक रिंगणात उतरतात याबाबत आता सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे
'राहुलदादाच' विधानसभेचे उमेदवार 'राहुलदादाच' विधानसभेचे उमेदवार Reviewed by Prashasak on जानेवारी १०, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.