या आश्वासनानंतर आता तरी पत्रकारांनचा हा प्रश्न सुटेल का?


प्रशासक न्यूज,दि.८जानेवारी

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे लोकशाहीचे इतर तीन स्तंभ आपले कर्तव्य पार पाडतात ते कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांना योग्य ते मानधन सरकारकडून मिळते पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी त्याला मात्र आपले कर्तव्य बजावण्यासाठी कुठलेही मानधन किंवा मोबदला मिळत नाही तरीसुद्धा सर्व पत्रकार एक सामाजिक सेवा म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात पत्रकार हा नेहमी सर्व समाज घटकांच ऐकून घेत असतो आणि समाजाला न्याय देण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडत असतो परंतु पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत त्या कोण ऐकून घेणार आणि त्या समस्या कोण सोडवणार हा प्रश्न पत्रकारांसमोर आहे

अहमदनगर जिल्ह्यातील बऱ्याचशा तालुक्यात पत्रकारांसाठी हक्काचे पत्रकार भवन उभे राहिलेले आहे श्रीगोंदा तालुक्यात दिग्गज नेते असून सुद्धा आज तागायतपर्यंत श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकार, पत्रकार भवना पासून वंचित आहेत पत्रकारांना बसण्यासाठी अजूनही हक्काची जागा मिळालेली नाही पत्रकार अनेक वर्षांपासून पत्रकार भवनाची मागणी राजकीय नेत्यांकडे करत आहेत परंतु श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय नेते मात्र या प्रश्नाबाबत फारसे गंभीर नाहीत

चालू वर्षी लोकसभा विधानसभा निवडणूका होत असल्यामुळे सर्वच राजकीय नेते मंडळींनी पत्रकारांना खुश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पत्रकार दिन साजरा करण्याचा धडाका चालवला आहे ही पत्रकारांसाठी आनंदाची गोष्ट असली तरी प्रत्येक वर्षी येणाऱ्या पत्रकार दिनाबाबत मात्र हे राजकीय लोक एवढे उत्सुक का नसतात इतर वेळेस नेत्यांना पत्रकार दिनाचा विसर का पडतो ही मात्र शोकांतिका आहे

काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी काल पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन केले होते यावेळी पत्रकारांनी पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे नागवडे यांच्या लक्षात आणून दिले नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर यांनीसुद्धा या मुद्द्याला हात घातला त्यानंतर राजेंद्र नागवडे यांनी पत्रकारांच्या मागणीचा विचार करून एक महिन्याच्या आत दोन गुंठे जागा पत्रकारांसाठी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही दिली त्यामुळे आता राजेंद्र नागवडे यांनी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर तरी श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांचा प्रलंबित असणारा पत्रकार भवनाचा विषय मार्गी लागणार का? हे पाहणे औसुक्याचे ठरेल

जागा उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा पत्रकार भवन बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज लागणार आहे त्यासाठी तालुक्यातील इतर नेते काय भूमिका घेतात याकडे पत्रकारांचे लक्ष लागले आहे त्यामुळे पत्रकारांकडून नेहमी आपल्या प्रसिद्धीची अपॆक्षा ठेवणाऱ्या नेत्यांनी मोठ्या मनाने पत्रकारांचा हा प्रश्न सोडवावा अशी अपॆक्षा तालुक्यातील पत्रकारांना आहे

*आमदारांना पत्रकार दिनाचा विसर*
पत्रकार दिन सगळीकडे साजरा होत असताना तालुक्याच्या आमदारांना मात्र पत्रकार दिनाचा विसर पडल्याचे दिसते आमदारांकडून पत्रकारांना साध्या शुभेच्छा देखील मिळाल्या नसल्यामुळे पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे

या आश्वासनानंतर आता तरी पत्रकारांनचा हा प्रश्न सुटेल का? या आश्वासनानंतर आता तरी पत्रकारांनचा हा प्रश्न सुटेल का? Reviewed by Prashasak on जानेवारी ०८, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.