प्रशासक न्यूज,दि.१७डिसेंबर
डीजेच्या कर्णकरकश्य आवाजामुळे लहान मुलं,वयोवृद्ध व्यक्ती, बिपीचा त्रास असणारे लोक यांना प्रचंड त्रास होतो या डीजेच्या आवाजामुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावल्याच्या घटना ताज्या आहेत असे असूनसुद्धा श्रीगोंदा शहरात राजरोसपणे डीजेचा दणदणाट चालू आहे याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आता या डीजेच्या अमर्याद आवाजाला लगाम घालण्यासाठी आणि या ध्वनीप्रदूषण करून लोकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या डीजे चालकांवर कारवाईच्या मागणीसाठी श्रीगोंद्याचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार बोरुडे हे आता मैदानात उतरले आहेत
जोर जोरात डीजे वाजवणाऱ्या डीजे चालक मालकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन बोरुडे यांनी श्रीगोंदा पोलिसांसह पोलीस अधीक्षक,प्रादेशिक परीवहन अधिकारी(R.T.O.)तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दिले आहे माजी नगराध्यक्ष बोरुडे यांनी डीजे चालकांणविरोधात घेतलेल्या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे
बोरुडे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की लग्नसराई सुरु असल्यामुळे शहरातील सर्व मंगल कार्यालयात मोठमोठ्या आवाजात डीजे वाजवले जात आहेत या मंगल कार्यालयाच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने लोक राहतात तसेच शाळा,सरकारी कार्यालये,हॉस्पिटल या मंगल कार्यालय परिसरात आहेत त्यामुळे या डीजेच्या कानठाळ्या बसवणाऱ्या आवाजाने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे असे असूनसुद्धा पोलीस या डीजे चालकांविरोधात कोणतीही कारवाई करत नाहीत
डीजे चालक डीजेच्या वाहनाला बनावट नंबर टाकत आहेत आर टी ओ ची कोणतीही परवानगी नसतानासुद्धा हे डीजे चालक खुलेआम डीजेच्या गाडयांनवर नियमबाह्य पद्धतीने मोठ्या आवाजाचे स्पीकर लावत आहेत याकडे पोलिसांसह आर टी ओ चे अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करत आहेत तरी अश्या धनीप्रदूषण करून लोकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या डीजे चालक मालकांवर तात्काळ कारवाईचे मागणी बोरुडे यांनी निवेदनद्वारे पोलिसांकडे केली आहे
*पोलिसांची बोटचेपेपणाची भूमिका,ठोस कारवाई होणे गरजेचे*
शहरात कोणताही सण उत्सव आला की जोर जोरात डीजे वाजवले जातात लग्नाच्या ठिकाणी कानाचे पडदे फाडणारा आवाज या डीजे वाल्यांचा असतो असे असूनसुद्धा पोलीस याकडे डोळेझाक करत आहेत ११२ वर संपर्क करून तक्रार केल्यावर सुद्धा पोलिसांकडून या डीजे वाल्यांविरोधात कुठलीही ठोस कारवाई होत नाही फक्त समज देण्याचे काम पोलीस करतात त्यामुळे डीजे वाल्यांची मुजोरी वाढत असल्याबाबत बोरुडे यांनी नाराजी व्यक्त केली
*थेट गुन्हे दाखल करणे गरजेचे*
मोठं मोठ्या आवाजात डीजे वाजवून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या डीजे चालकांवर थेट गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे जरुरी आहे
पोलीस काय भूमिका घेणार?
मागील काही दिवसात श्रीगोंदा शहरातील सर्वच नागरिक या कर्णकरकश्य वाजणाऱ्या डीजेच्या आवाजामुळे हैराण झाले आहेत दहीहंडी उत्सवात राजकीय लोकांनी लावलेल्या डीजेच्या आवाजामुळे त्या परिसरातील अनेक लोकांना आपले घरसोडून काहीवेळासाठी बाहेर जावं लागलं होत एवढ्या मोठा आवाजात डीजे सुरु असूनसुद्धा पोलिसांनी मात्र कोणतीच कारवाई ण केल्यामुळे लोकांमध्ये पोलिसांच्या या बघ्याच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आळी होती परंतु आता माजी नगराध्यक्षानी दिलेल्या निवेदनावर पोलीस आता तरी कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
डीजेच्या दणदणाटाविरोधात माजी नगराध्यक्ष आक्रमक!
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर १७, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर १७, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: