प्रशासक न्यूज,दि.२७जानेवारी
विशाल अ चव्हाण
महाराष्ट्र राज्य बाजारसमितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांची सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चांगलीच गट्टी जमल्याचे दिसत आहे फक्त बाळासाहेब नाहाटाच नाहीतर त्यांचे पुत्र मितेश यांची देखील अजित दादांशी वाढलेली जवळीक हा सध्या चर्चेचा विषय आहेकुठलीही राजकीय पार्शवभूमी नसताना बाळासाहेब नाहाटा यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आमदार बबनराव पाचपुते यांच्यासोबत असताना नाहाटा प्याटर्न चांगलाच गाजला होता त्यानंतर नाहाटा यांनी श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजारसमितीचे सभापती म्हणून अनेक वर्षे कामकाज पहिले आ पाचपुते यांच्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांना साथ देत शेलार यांना विधासभेला उभे करून त्यांना निवडून आणण्यासाठी चांगलेच रान पेटवले होते परंतु त्यात त्यांना तेव्हा अपयश आले त्यानंतर त्यांनी कधी राहुल जगताप,कधी राजेंद्र नागवडे या तालुक्यातील नेत्यांसोबत आपले सुर जुळवले नाहाटा आणि स्व सदाशिव आण्णा पाचपुते यांची मैत्री सर्वश्रुत आहे
मागील काही दिवसांपूर्वी नाहाटा आणि राजेंद्र नागवडे यांच्यात एवढे राजकीय वैमनस्य आले होते कि ते दोघे एकमेकांना एकेरी नावाने उल्लेख करत एकमेकांना निवडणुकीत गाडल्याची भाषा करताना चे या दोन्ही नेत्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते परंतु राजकारण कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसते त्यामुळे आता त्याच नागवडे आणि नाहटांचे पुन्हा सूत जुळल्याचे पाहायला मिळत आहे
तालुक्यातील सर्व नेत्यांसोबत जवळीक साधणाऱ्या बाळासाहेब नाहाटा यांनी आता मात्र थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीच गट्टी जमवल्यामुळे तालुक्यात राजकीय चर्चाना उधाण आले आहे फक्त नाहटाच नाहीतर त्यांचे पुत्र मितेश यांचिदेखील अजित दादांसोबत चांगलीच नाळ जुळल्याचे पाहायला मिळत आहे मागच्या आठवड्यातच स्व शिवाजीराव नागवडे यांच्या ९० व्या जयंती सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे श्रीगोंदा कारखान्यावर आले असता पुण्याला जाताना त्यांनी मितेश नाहाटा यांना त्यांच्यासोबत हेलिकॅप्टर मधून नेले त्याचीदेखील सगळीकडे चर्चा झाली कुठलेही पद नसताना अजित दादांशी नाहाटा कुटुंबाची झालेली जवळीक हा चर्चेचा विषय बनला आहे
चौकट/-मितेश यांच्यावर ठाणे शहराची जबाबदारी
मितेश नाहाटा यांची अजित पवार गट राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या ठाणे शहर निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)चे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी या निवडीचे पत्र मितेश यांना दिले आहे

नाहाटा पिता-पुत्रांची आता थेट अजित दादांशीच जवळीक!मितेश यांच्याकडे ही जबाबदारी
Reviewed by Prashasak
on
जानेवारी २६, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
जानेवारी २६, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: