प्रशासक न्यूज,दि.२८ नोव्हेंबर
श्रीगोंदा शहरामध्ये मुख्य रस्त्यावर,मुख्य चौकात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या होर्डींग काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मीरा शिंदे यांनी श्रीगोंदा नगरपरिषदेकडे पाठपुरावा केला होता या होर्डिंग न हटवल्यास गुरुवार दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून श्रीगोंदा नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करणार असल्याचे निवेदन त्यांनी नगरपरिषदेला आठ दिवसांपूर्वी दिले होते
निवेदन दिल्यानंतर श्रीगोंदा नगरपरिषदेने सुमारे ५० छोट्या-मोठ्या होर्डिंगधारकांना तीन दिवसांत होर्डिंग काढून घेण्याबाबत सूचित केले परंतु कोणतीही ठोस कारवाई नगरपरिषदेने न केल्यामुळे श्रीमती मीरा शिंदे या आक्रमक झाल्या असून गुरुवार दि.३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११वाजल्यापासून त्या श्रीगोंदा नगरपरिषद कार्यलयासमोर आमरण उपोषण सुरु करणार आहेत जोपर्यत श्रीगोंदा शहरातील सर्व होर्डिंग हटवले जात नाहीत तोपर्यत त्या उपोषण सुरु ठेवणार आहेत
या होर्डिंग वर कारवाई करण्यासाठी शिंदे या मागील एक महिन्यापासून पाठपुरावा करत आहेत. मात्र नगरपरिषद कार्यालयाकडून सदरील अनधिकृत होर्डींगवर अजूनही कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही. ५४८ डी मुंबई – बीड हा राष्ट्रीय महामार्ग श्रीगोंदा शहरातून जात असून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांचे F.NO.RW/NH33044/35/2001/S&R(R) दिनांक १६/०५/२००२ च्या परिपत्रकानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या शासकीय हद्दीमध्ये असणारे जाहिरात फलक काढण्याचे निर्देश देण्यात आलेले असतानाही शहरामध्ये विनापरवानगी मोठ्या आकाराचे होर्डींग (जाहिरात फलक) ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. या फलकांमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत ही होर्डींग लावताना कोणत्याही निर्देशाचे पालन करण्यात आलेले नाही. सदर अनधिकृत सर्व होर्डींग, जाहिरात फलक तातडीने काढण्यात यावे. काढलेल्या होर्डींगचे साहित्य होर्डींगमालकाला न देता त्या सर्व साहित्य नगरपरिषदेने ताब्यात घेवून सदरील भंगाराचा जाहीर लिलाव करण्यात यावा. बेकायदेशीर होर्डींग लावणाऱ्या जाहिरातदार यांच्यावर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या सर्व मागण्यासाठी हे आमरण उपोषण त्या करणार आहेत
चौकट/-आता नगरपरिषदेच्या भूमिकेकडे लक्ष
शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर होर्डिंग लागलेल्या असताना सुद्धा नगरपरिषद या होर्डिंग वर कोणतीही कारवाई का करत नाही याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मीरा शिंदे यांनी कारवाई होत नाही तोपर्यत आपले उपोषण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे श्रीगोंदा नगरपरिषद आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

कारवाई करा अन्यथा---या मागणीसाठी 'सामाजिक' कार्यकर्त्या आक्रमक!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर २८, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर २८, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: