श्रीगोंदा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ,पती पत्नीला मारहाण



प्रशासक न्यूज,दि.२२ नोव्हेंबर

लोणी व्यंकनाथ शिवारात डोळ्यात मिरची पूड टाकून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच आज मध्यरात्री चोरट्यांनी मोठ्या संख्येने राहिवासी असलेल्या भागात चांगलाच गोंधळ घातला एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरी करून रोख रक्कम,सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला एका घरी पती पत्नीला या चोरट्यानी मारहाण देखील केली असून त्यात ते पती पत्नी किरकोळ जखमी झाले आहेत

आज मधरात्री भरवस्तीत चोरट्यानी घातलेल्या या गोंधळामुळे परिसरातील नागरिक चांगलेच दहशतीमध्ये आहेत

याबाबत प्राथमिक माहिती अशी की श्रीगोंदा शहरातील शिवाजीनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या बाजूला एका सोसायटीत आज मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास तोंड बांधलेले हातात मोठे चाकू असलेल्या चार चोरट्यानी प्रवेश करत सोसायटीत खालच्या बाजूला आपल्या मुलासह राहणाऱ्या एका महिलेच्या घराचा दरवाजा तोडून घरात जाऊन त्या महिलेचा गळा दाबून चाकूचा धाक दाखवून त्या महिलेच्या घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले

त्यानंतर चोरट्यानी तिथून जवळच असणाऱ्या एका घराकडे आपला मोर्चा वळवला त्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश मिळवला त्या घरातील पती पत्नी आवाजाने जागे झाले त्यावेळी चोरट्यानी त्या पती पत्नीला मारहाण केली तिथून काही मुद्देमाल चोरट्यानी चोरून नेल्याची माहिती समजली आहे

मारहाण होत असलेल्या घरातून महिलेच्या ओरडण्याचा आवाज आल्यामुळे आजूबाजूचे लोक जागे झाले त्यानी याबाबत नगरसेवक प्रशांत गोरे यांना फोनवरून माहिती दिली त्यानंतर नगरसेवक गोरे यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत पोलिसांना याबाबत माहिती देऊन स्वतः पोलिसांना घेऊन घटनास्थळ गाठले परंतु तोपर्यत चोरटे पसार झाले होते

भरवस्तीत येऊन महिलेला धमकावून अश्या प्रकारे चोरी केल्यामुळे नागरिक घाबरले आहेत लवकरात लवकर या चोरांना अटक करण्याची मागणी होत आहे

*सोसायटीत राहणाऱ्या लोकांनी सिसिटीव्ही कॅमेऱ्यासह सेफ्टी डोर बसवणे गरजेचे*
शहरात सोसायटीत राहणाऱ्या लोकांनी आपल्या सोसायटीत सिसिटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे आपल्या सुरक्षेसाठी घराला सेफ्टी डोर बसवणे सुद्धा गरजेचे आहे

*चोरट्याना जेरबंद करून चोऱ्यांचे सत्र थांबवण्याचे पोलिसांसमोर आव्हान*
श्रीगोंदा शहरात सुरु झालेले चोऱ्यांचे सत्र तसेच रस्तालूट झालेल्या प्रकरणातील आरोपी जेरबंद करणे हे श्रीगोंदा पोलिसांसमोर आव्हान असणार आहे
श्रीगोंदा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ,पती पत्नीला मारहाण श्रीगोंदा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ,पती पत्नीला मारहाण Reviewed by Prashasak on नोव्हेंबर २१, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.