प्रशासक न्यूज,दि.२१ नोव्हेंबर
दोन दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी स्कॉर्पिओ अडवून स्कॉर्पिओ मध्ये बसलेल्या लोकांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्याकडील एक लाख रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाईल असा एकूण एक लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला सदर घटना काल सोमवार दिनांक 20 रोजी रात्री नऊ वाजण्याचा सुमारास लोणी व्यंकनाथ गावच्या शिवारातील गायकवाड वस्ती नजिक घडली आहे
सदर लुटीच्या घटनेबाबत नितीन विठ्ठल आढागळे रा बोरी यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की वरील तारखेस व वेळी फिर्यादी नितीन आढागळे व त्यांचे साथीदार स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच ०४ ईडी ६६५९ हिच्यामधून लोणीव्यंकनाथ गावच्या शिवारातून माठकडे जात असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन दिचाकीवरून आलेल्या चार अज्ञात इसमानी आढागळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांना गाडीच्या खाली ओढून लाथाबुक्क्यानी मारहाण करत हातात असलेल्या कोयत्याचा धाक दाखवून वरील किंमतीचा मुद्देमाल लुटून नेला
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत
डोळ्यात मिरचीची पूड टाकून लूटले
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर २०, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर २०, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: