अनैतिक संबंधाबाबत विचारणा केल्याच्या रागातून पत्नीची हत्या


प्रशासक न्यूज,दि.१८ नोव्हेंबर

अनैतिक प्रेमसंबंधांबाबत विचारणा केल्याचा राग आल्यामुळे पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक या गावात दि १०नोव्हेंबर रोजी घडली असून याबाबत आज श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि पारगाव सुद्रिक येथील मयत रुपाली ज्ञानदेव आमटे वय (२४वर्ष)यांनी त्यांचे पती ज्ञानदेव पोपट आमटे वय (३३वर्षे)यांना त्यांच्या बाहेरील अनैतिक प्रेम संबंधाबाबत विचारणा केली त्याचा आरोपी ज्ञानदेव याला राग आला त्यातून त्यानी रुपाली यांना कश्याचे तरी सहाय्याने मारहाण करून जीवे ठार मारले पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने आरोपी पतीने आपल्या पत्नीचा मृतदेह कापडामध्ये बांधून घराच्या बाजूला खड्डा करून पुरून टाकला आणि आपली पत्नी हरवल्याची खोटी तक्रार दिली

परंतु काही दिवसातच रुपाली या हरवल्या नसून त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून रोहित संतोष मडके रा फक्राबाद ता जामखेड यांच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानदेव पोपट आमटे याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अनैतिक संबंधाबाबत विचारणा केल्याच्या रागातून पत्नीची हत्या अनैतिक संबंधाबाबत विचारणा केल्याच्या रागातून पत्नीची हत्या Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १७, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.