वनविभागाने पिंजरा लावला आणि--


प्रशासक न्यूज,दि.३० नोव्हेंबर

अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार होता लोकांना हा बिबट्या वारंवार दिसत होता या बिबट्याला जेरबंद करण्याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा श्रीगोंदा वनविभागाला संपर्क केला परंतु वनविभागाने याबाबत फारशी दखल घेतली नसल्याचा आरोप वडाळी ग्रामस्थांनी केला आहे

वारंवार दिसणाऱ्या या बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी अखेर सरपंचानी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या वनविभागाने अखेर दोन दिवसांपूर्वी वडाळी गावातील शेलार वस्ती परिसरात पिंजरा लावला आणि आज सकाळी या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला

सकाळी बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली वनविभागाची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे

चौकट/-बिबट्या अडकला पण पिंजऱ्याची अडचण

वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला खरा पण हा पिंजरा नादुरुस्त असल्यामुळे बिबटयाला दुसरीकडे हालवण्यात अडचणी येत आहेत याबाबत वनवीभागाशी संपर्क साधून माहिती घेतली असता बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे पिंजऱ्याची लोखंडी पट्टी फुगल्यामुळे बिबट्याला शिफ्ट करण्यात अडचण येत आहे दुसरा पिंजरा मागवला असून काहीवेळातच बिबटयाला वरिष्ठाच्या आदेशानुसार या ठिकाणाहून हलवून दुसरीकडे सोडण्यात येईल अशी माहिती दिली

चौकट/-अजून एक मादी बिबट्या व तिचे पिल्ले मोकाटच

आज पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला असला तरी अजुनसुद्धा एक मादी बिबट्या व तिची दोन पिल्ले या परिसरता फिरत असल्याचा संशय गावाकऱ्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे या मादी बिबट्याला देखील तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत आहे
वनविभागाने पिंजरा लावला आणि-- वनविभागाने पिंजरा लावला आणि-- Reviewed by Prashasak on नोव्हेंबर २९, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.