प्रशासक न्यूज,दि.२२सप्टेंबर
श्रीगोंदा तालुक्यातील भिमा नदी पट्टातील गार विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 18/09/2023 रोजी ठीक ११ वाजता गार सोसायटी येथे संपन्न झाली.सभेचे अध्यक्ष चेअरमन श्री.जितुशेठ मगर होते.
यावेळी श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्हा. चेअरमन मा.सौ.मनिषाताई मगर यांची निवड झाल्याबद्दल गार सोसायटीच्या वतीने संचालिका सौ. रुपाली ताई सुर्यवंशी यांनी केला. मा.सरपंच मा.चेअरमन योगेशनाना मगर ,मा.श्री. सदाशिव राव जाधव, मा.श्री.प्रल्हादनाना शेळके, सोसायटी चे माजी राजेंद्र (भाऊ)मगर ,सोपानराव शेळके तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री हौसराव परकाळे, मा.सरपंच,मा.चेअरमन अनिलराव मगर, भुजंगराव शेळके,यांनी सोसायटीच्या कारभारावर भाषणा द्वारे समाधान व्यक्त केले.
गार सोसायटी संचालक मा.श्री.सोमनाथ जाधव, हरिभाऊ शेळके, अशोक मचाले, सचिन लोखंडे, मच्छिंद्र खरात,बिभीषण सुर्यवंशी,त्रिंबक परकाळे,मोहन शिपलकर तसेच सचिव विलास शेवाळे यावेळी उपस्थित होते.सिताराम तावरे,शरद शेळके,श्रीकांत मगर,सुनिल जाधव, खिवराज मचाले, रविंद्र मचाले,अमोल सुर्यवंशी,लालासाहेब शेळके सभासद उपस्थित होते.गार सोसायटीचे ३१.३.२३ पय॔त भागभांडवल ५०७२७५६ असे असुन सोसायटीचा नफा १००८८०४ येवढा झाला आहे.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन श्री. जितुशेठ मगर यांनी सोसायटीच्या मागेल त्या सभासदांना पाईप लाईन,होम लोन ,शेती वाहन,चार चाकी,संकरित गाय/ म्हैस ,पिक कर्ज, पशुपालन (खावटी) सौरऊर्जा ,असे अनेक सभासदांचे कर्ज प्रकरणे केले जातील असे सांगितले.तसेच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अनेक योजना गार सोसायटी मार्फत राबविण्यात येतील अशी ग्वाही मगर यांनी दिली.
उपस्थित सभासदांचे आभार व्हा.चेअरमन श्री. बबनराव गावडे यांनी मानले.
गार सोसायटीच्या सभासदांना ११% लाभांश/-चेअरमन जितूशेठ मगर
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २१, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २१, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: