'त्यांच्या' दादागिरीला आवर घालण्याची मागणी!


प्रशासक न्यूज,२२सप्टेंबर

दौंड नगर रस्त्यावर अरणगाव शिवारात रेल्वे क्रॉसिंग जवळ काही तृतीयपंथी लोक रोज त्याठिकाणी रस्त्यात उभे राहून जबरदस्तीने वाहने अडवून पैसे उकळत आहेत अश्या प्रकारे रस्त्यात उभे राहून वाहन चालकांना अरेरावी करणाऱ्या या लोकांना पोलिसांनी समज देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता या रस्त्याने प्रवास करणारे लोक करत आहेत

जबरदस्तीने वाहन अडवणे,वाहन चालक गाडी थांबवत नसेल तर रस्त्याच्या मधोमध येऊन उभे राहणे,गाडीवर जोरात थाप मारणे,गाडीचालकाणे पैसे देण्यास नकार दिल्यास त्याला शिवीगाळ करणे,दमदाटी करणे असे प्रकार याठिकाणी घडतं आहेत याबद्दल अनेक प्रवाश्यांमध्ये तीव्र नाराजी असुन पोलिसांनी वाहनचालकांना त्रास देणाऱ्या या तृतीयपंथी लोकांना समज देणे गरजेचे आहे

या प्रकारबाबत कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही
'त्यांच्या' दादागिरीला आवर घालण्याची मागणी! 'त्यांच्या' दादागिरीला आवर घालण्याची मागणी! Reviewed by Prashasak on सप्टेंबर २१, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.