प्रजापती कुंभार संघाच्या प्रदेश संघटक पदी चंदन यांची नियुक्ती...


प्रशासक न्यूज,दि.२०सप्टेंबर

अखिल भारतीय प्रजापती कुंभार संघाच्या राज्य कार्यकारणीमध्ये प्रदेश संघटक म्हणून अहमदनगर श्रीगोंदा येथील संघाचे माजी जिल्हा महासचिव योगेश पोपट चंदन यांची संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गंगाधर जोर्वेकर यांनी नियुक्तीचे पत्र देत निवड केली.

अखिल भारतीय प्रजापती कुंभार संघाच्या राज्य कार्यकारणी नुकतीच पार पडली. या कार्यकारणीमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे माजी जिल्हा महासचिव योगेश चंदन यांची प्रदेश संघटक म्हणून निवड करण्यात आली. अखिल भारतीय प्रजापती कुंभार समाज संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष गंगाधर जोर्वेकर यांनी नियुक्तीचे पत्र देत निवड केली. राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय महासचिव यांच्या आदेशाने त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. योगेश चंदन यांनी या आगोदर अखिल भारतीय प्रजापती कुंभार समाज संघटनेच्या अहमदनगर जिल्हा महासचिव म्हणून तीन वर्ष कामकाज पाहत कुंभार समाजाच्या प्रशासकीय पातळीवर अडीअडचणी बाबत पाठपुरावा करत निराकरण करण्याचे काम केले. या निवडीबाबत महाराष्ट्र राज्यअध्यक्ष गजानन कोळमकर, भागवत कराडकर, संजय दिवटे, बन्सीलाल प्रजापती, अशोक ईश्वरे, अशोक शिंदे, दत्ता काळे, यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रजापती कुंभार संघाच्या प्रदेश संघटक पदी चंदन यांची नियुक्ती... प्रजापती कुंभार संघाच्या प्रदेश संघटक पदी चंदन यांची नियुक्ती... Reviewed by Prashasak on सप्टेंबर २०, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.