प्रशासक न्यूज,दि.२०सप्टेंबर
आपल्याला आयुष्याशी खूप तक्रारी असतात. आपल्या आयुष्यात किती संघर्ष आहे याच्याविषयी आपण नेहमी तक्रार करतो. आपण नेहमी आपल्या आयुष्यात किती कष्ट आहेत, या विषयी चर्चा करत असतो. इतकी मेहनत केल्यानंतरही आपल्याला यश मिळत नाही म्हणून आपण नाराज होतो. याबाबत सातत्याने इतरांकडे नाराजी व्यक्त करतो. अर्थात सर्वच तशी चर्चा करत नाहीत. पण नकारात्मक गोष्टींकडे माणूस जास्त लवकर आकर्षिला जातो त्यांच्यासाठी ही प्रेरणादायी बातमी
एक आठवी इयत्तेत शिकणारा मुलगा आयएएस होण्याचं स्वप्न पाहतोय. विशेष म्हणजे आयएएस होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, अभ्यास कसा करावा, किती तास अभ्यास करावा, आठवड्यात किती सिनेमे पाहावे आणि मित्रांसोबत किती वेळ खेळावं याबद्दल त्याला खूप चांगली माहिती आहे. तो याबाबत सविस्तर आणि मुद्देसूद विश्लेषणही करतोय. त्याचं हे विश्लेषण पाहून एक बडे पोलीस अधिकारी देखील भारावून गेले. त्यांनी या मुलासोबत संभाषणाचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होतोय.
चंद्रपूरचे पोलीस अधीक्षकांची चिमुकल्याशी चर्चा
व्हायरल झालेल्या या संबंधित व्हिडीओत सायकलवर मुलाशी संभाषण करणारी व्यक्ती हे बडे पोलीस अधिकारी आहेत. ते चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी आहेत. त्यांना सायकलिंग करण्याची आवड आहे. त्यामुळे ते सायकलिंग करायला बाहेर पडले होते. ते सायकलिंग करत असताना डोंगरहळदी गावाजवळ पोहोचले. तिथे त्यांना रस्त्यावर एक मुलगा सायकल चालवताना दिसला. परदेशी यांनी त्याच्याशी संवाद साधला.

'त्या' मुलाशी संवाद साधल्यानंतर पोलीस अधीक्षकही भारावले!
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २०, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २०, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: