प्रशासक न्यूज,दि.१९सप्टेंबर
श्रीगोंदा तालुक्यातील नगर दौंड रस्त्यावरील शिरसगाव बोडखा शिवारात नायरा पेट्रोल पंपाजवळ काल रात्री झालेल्या अपघातात काष्टी येथील सचिन नितीन ठुबे वय-१७वर्ष व आकाश ज्ञानेश्वर ढगे वय-२६वर्षे हे दोन तरुण गंभीर जखमी झाल्यामुळे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे काष्टी गावावर शोककळा पसरली आहे
सदर घटनेबाबत महेंद्र सुपेकर यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की काष्टी (पुनर्वसन)येथील राहणारे हे दोघे तरुण दुचाकीवरून काल रात्री काष्टीकडे येत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्यामुळे ते दोघे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले त्यानंतर लोकांनी मयत तरुणांच्या घरच्यांना या दुर्घटनेबाबत माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात आणले
गणपती बसण्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
नगर-दौंड रस्त्यावर पुन्हा अपघात:,दोन तरुण जागीच ठार!
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर १८, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर १८, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: