सफरचंदाचा केला भाव,म्हणून त्याने केला कोयत्याने घाव!


प्रशासक न्यूज,दि.१८सप्टेंबर

सफरचंद खूप बारीक आहेत भाव व्यवस्थित लावून द्या असे म्हणल्याचा राग आल्यामुळे फळविक्रेत्याने फळे घेण्यासाठी आलेल्या ग्राहक व त्याच्या मित्रावर जीवघेणा हल्ला करत एकाच्या डोक्यात कोयत्याचा घाव घालून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना श्रीगोंदा शहरात काल रवीवारी रात्री पावनेनऊ वाजण्याच्या सुमारास बगाडे कॉर्नर येथे घडली आहे या घटनेमुळे श्रीगोंदा शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे

सदर घटनेबाबत शेखर दत्तात्रय गव्हाणे रा. आढळगाव यांच्या फिर्यादीवरून अतिक बागवान,अजहर बागवान,जुबेर बागवान सर्व रा. श्रीगोंदा या तिन फळविक्रेत्यांनविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्रीच तत्काळ घटनास्थळी धाव घेत तिन्ही आरोपीना ताब्यात घेतले आहे

प्रेमदास उबाळे रा.आढळगाव असे कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे

गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काल रात्री गव्हाणे व उबाळे हे दोघे श्रीगोंदा शहरातील बगाडे कॉर्नर येथील संबंधित फळविक्रेत्यांकडे फळे घेण्यासाठी गेले असता गव्हाणे यांनी सफरचंद कसे आहेत असे विचारले त्यानंतर फळविक्रेत्याने सफरचंदाचा भाव सांगितल्यानंतर गव्हाणे यांनी सफरचंद खूप बारीक आहेत भाव व्यवस्थित लावून द्या असे सांगितले असता त्याचा फळविक्रेता अतिक बागवान याला राग आला त्यामुळे त्याने या दोघांना जिवंत सोडू नका रे हे लई शहाणपणा करतायेत असे अजहर व जुबेर बागवान यांना सांगितले त्यानंतर त्यांनी गव्हाणे व उबाळे यांना शिवीगाळ करत फळे ठेवण्याच्या कॅरेटने मारहाण केली तसेच नारळ फोडण्याच्या कोयत्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्रेमादास उबाळे याच्या डोक्यात कोयत्याने घाव घातला त्यात उबाळे हे गंभीर जखमी झाले डोक्यात घाव लागल्याने ते रक्तबंबाळ झाले या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या उबाळे यांना उपचारासाठी नगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत तर गव्हाणे हे हल्ल्यात किरकोळ जखमी झाले आहेत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करत आहेत

चौकट/-शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
काल झालेल्या या कोयता हल्यानंतर संतप्त झालेल्या आढळगाव येथील सरपंच शिवप्रसाद उबाळे,खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे यांच्यासह आढळगाव येथील तरुणांनी आज सकाळी घटना घडलेल्या बगाडे कॉर्नर येथे येऊन अतिक्रमण धारकांना चांगलेच धारेवर धरत अतिक्रमन काढण्यास सांगितले तसेच या अतिक्रमनावरून मुख्याधिकऱ्यांच्या विरोधात देखील तीव्र नाराजी व्यक्त केली

या आधीचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी शहरातील अतिक्रमने काढून शहराचा श्वास मोकळा करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते बदलून गेल्यानंतर परत रस्त्याच्या कडेला फळविक्रेत्यांनी अतिक्रमन केले आहे तरी देखील श्रीगोंदा नगरपरिषद त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे त्याबाबत लोकांमध्ये नाराजी आहे
सफरचंदाचा केला भाव,म्हणून त्याने केला कोयत्याने घाव! सफरचंदाचा केला भाव,म्हणून त्याने केला कोयत्याने घाव! Reviewed by Prashasak on सप्टेंबर १८, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.