प्रशासक न्यूज,दि.२३सप्टेंबर
श्रीगोंदा शहरानजिक पेडगाव रस्त्यावर मोठ्या गणपती मंदिराच्या मागच्या बाजूला सूरज घोडके यांना त्यांच्या शेतामध्ये काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्याची दोन पिल्ले दिसून आली त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा निष्पन्न झाले आहे
घोडके हे काल सायंकाळी शेतामध्ये गेले असता ही पिल्ले त्या ठिकाणी त्यांना दिसून आली या पिल्लांची आई मादी बिबट्या आसपास असण्याची शक्यता लक्षात घेऊन रात्रीची वेळ असल्यामुळे घोडके हे तिथून निघून गेले या भागात बिबट्या ची पिल्ले व मादी बिबट्याचा चा वावर असल्याबाबत या भागातील अनेक लोकांनी दुजोरा दिला आहे त्यामुळे वनविभागाने या भागात बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करणे गरजेचे आहे
*वनविभागाबाबत नाराजगी*
या भागातील अनेक लोकांना बिबट्या व त्याची पिल्ले अनेकवेळा दिसून आली आहेत काहींनी याबाबत वनविभागाकडे संपर्क साधला परंतु वनविभागाकडून मात्र त्या गोष्टीला फारसा प्रतिसाद मिळत नाही तो बिबट्या नसेल रानमांजर असेल असे उत्तर वनविभागाचे लोक देतात त्यामुळे बिबट्याचा वावर असन्याच्या या माहितीकडे वनविभाग डोळेजाक करत असल्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे
बिबट्याची दोन पिल्ले आढळून आल्यामुळे परिसरात घबराट
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २२, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २२, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: