मागणीवर ठाम,पाटलांनी फोडला सरकारला घाम!


प्रशासक न्यूज,दि.५सप्टेंबर

जालन्यातले मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. त्यांनी सरकारला मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढण्यासाठी राज्य सरकारला 4 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. त्यानंतर पाण्याचाही त्याग करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या उपोषस्थळी गेले होते. मात्र गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाला जरांगेंचं मन वळवण्यात अपयश आलं. मात्र सरकार लवकरात लवकर जीआर (GR) काढणार असल्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजनांनी जरांगेंना दिलं.

राज्यमंत्रिमंडळाची बैठक
राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी म्हणजे 6 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा होणार असल्याचं समजतंय.. जालनामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं आज त्यांची भेट घेऊन चर्चा केली. पण कोणताही तोडगा निघालेला नाही. या चर्चेचा तपशील उद्याच्या बैठकीत मांडण्यात येणाराय.
मागणीवर ठाम,पाटलांनी फोडला सरकारला घाम! मागणीवर ठाम,पाटलांनी फोडला सरकारला घाम! Reviewed by Prashasak on सप्टेंबर ०५, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.