प्रशासक न्यूज,दि.११सप्टेंबर
श्रीगोंदा तालुक्याला वाळूचे माहेरघर मानले जाते यातूनच अनेक वाळूतस्कर तालुक्यात निर्माण झाले असून अवैध वाळू उपशातून मिळणाऱ्या पैश्यांमुळे या वाळूतस्करांची दादागिरी वाढली आहे त्यातूनच पोलीस,महसूल पथकावर हल्ला करणे शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुकी,दमदाटी करणे धमकावणे असे प्रकार आतापर्यत या वाळूतसकरांनी अनेकवेळा केले आहेत काल सुद्धा वाळूतसकारांच्या दादागिरीचा एक प्रकार समोर आला आहे
काल दि १०सप्टेंबर रोजी रात्री श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रक क्र एमएच१२,एच डी १०१२ त्यात २०हजार रुपये किंमतीची चार ब्रास वाळू असलेला हा ट्रक शेवगाव वरुन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने श्रीगोंद्यात अनाधिकृत गौण खनीज प्रतिबंधक कारवाईसाठी आलेल्या शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे,शेवगाव तहसील कार्यालयातील अव्वल कारकून विठ्ठल गोरे,तलाठी मंगेश कदम या महसूल पथकाने पेडगाव गावातील मराठी शाळेजवळ पकडला त्यानंतर या महसूल पथकाने हा ट्रक ताब्यात घेऊन ते श्रीगोंद्यात आले असता शहरातील पेडगाव चौकात आसिफ शमशुद्दीन तांडेल रा पेडगाव हा त्याच्या नऊ ते दहा साथीदारांसोबत तेथे आला त्याने महसूल पथकाने कारवाईसाठी चालवलेला ट्रक अडवून ट्रकमधूल महसूल कर्मचाऱ्यांना बळाचा वापर करून ट्रकमधून खाली ओढत सदर ट्रक महसूल पथकाच्या ताब्यातून पळवून नेला
त्यानंतर सदर महसूल पथकाने पाठलाग केला असता आसिफ तांडेल याने त्याच्या ताब्यातील टाटा नेकसोंन कार सोडून पळ काढला महसूल पथकाने विना क्रमांकाची ५लाख रु किंमतीची सदर कार ताब्यात घेतली
त्यानंतर शेवगाव तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या फिर्यादीवरून आसिफ तांडेल व त्याच्या नऊ ते दहा साथीदारानंविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करत आहेत
चौकट/-थेट शेवगाव वरुन कारवाईसाठी महसूल चे पथक श्रीगोंद्यात का आले?
महसूल पथकाने केलेल्या कारवाईवर आता काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत श्रीगोंदा तालुक्यात कारवाईसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट शेवगावं वरुण महसूल पथक का पाठवले स्थानिक महसूल यंत्रनेवर त्यांचा विश्वास नाहीं का असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत
चौकट/-पोलिसांना सोबत न घेता हे पथक कारवाईसाठी का गेले?
श्रीगोंद्यासह अनेक भागात करावाईसाठी गेलेल्या पथकावर वाळूतस्करांकडून सातत्याने हल्ले होण्याच्या घटना घडतं असताना शेवगाव वरुण आलेल्या पथकाने स्थानिक पोलिसांना सोबत न घेता कारवाई का केली कारवाईसाठी जाताना त्यांनी पोलीस बंदोबस्त सोबत का नेला नाहीं असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे
श्रीगोंद्यात वाळू तस्करांची पुन्हा दादागिरी,दहा ते अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ११, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ११, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: