भरपावसात कार्यकर्त्यांनी लुटला सभेचा आनंद:,आ.थोरातांचा कार्यकर्त्यांना हा सल्ला


प्रशासक न्यूज,दि.५सप्टेंबर

आमदारांची फोडाफोडी करुन आलेले हे तिघाडी सरकार राज्यात पुन्हा दिसणार नाहीं हे सरकार म्हणजे एकाच म्यानात तीन तलवारी आहेत शेतकऱ्यांवर आस्मानी आणि सुलतानी संकट आले आहे पण हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही आणि प्रश्न सोडवत नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेरोजगारी,महागाई या महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष न देता ईडी, इन्कम टॅक्स वाले विरोधकांच्या मागे लावून फोडाफोडी करण्यात स्वतःला धन्य मानत आहेत अशी सडकून टीका करत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकार व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला
हिरडगाव येथे काल सोमवारी संध्याकाळी  काँग्रेसच्या विभागीय जनसंवाद यात्रेचा शुभारंभ बाळासाहेब थोरात यांचे हस्ते करण्यात आला भर पाऊसातच हा शुभारंभ करण्यात आला सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे होते

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की आमचे अजीत पवार हे मुख्यमंत्री होण्याच्या आशेने तिकडे गेले ते उपमुख्यमंत्री झाले पण आता सध्या त्यांची फाईल देवेंद्र फडणवीस यांना दाखवल्याशिवाय पुढे जात नाही ही सत्यता आहे महाराष्ट्र काँग्रेसमय होत आहे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन विचाराची पेरणी करावी असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले की आपण आंदोलन केल्यामुळे घोडचे पाणी सरकारला सोडावे लागले केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी आणली. नोकऱ्यांमध्ये कपात केली त्यामुळे देशभर महागाई आणि बेरोजगारीचा वणवा पसरला आहे

महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे म्हणाल्या की,मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केले तर सरकारने त्यांच्यावर काठी उगारण्याचे काम केले याची किमंत भाजपा सरकारला मोजावीच लागेल

नागवडे साखर कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर म्हणाले कि हिरडगाव परीसरात एक विजेचे सबस्टेशन होणे गरजेचे असुन आगामी विधानसभा निवडणुकीत अनुराधा नागवडे यांना संधी द्या आम्ही विरोधकांना धोबीपछाड करु
यावेळी आमदार लहू कानडे,अंबादास दरेकर यांची भाषणे झाली

चौकट/-काँग्रेसच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन
हिरडगाव येथील कार्यक्रमा आगोदर श्रीगोंदा शहरात नव्याने सुरु करण्यात आलेल्या श्रीगोंदा तालुका काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उदघाटन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले

चौकट/-भरपावसात कार्यकर्ते हजर
जनसंवाद यात्रेचा शुभारंभा दरम्यान हिरडगाव येथे वरुणराजाने हजेरी लावली परंतु अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊसचे आगमन झाल्यामुळे सुखावलेल्या कार्यकर्त्यांनी भरपावसातच या सभेचा आनंद लुटला

चौकट/-नागवडे पती,पत्नीच तोंडभरून कौतुक
काल झालेल्या सभेत बोलताना माजी मंत्री थोरात यांनी स्व शिवाजीराव नागवडे यांच्या कामाच्या आठवनींना उजाळा देतानाच राजेंद्र नागवडे यांच्या कामाचं कौतुक करून अनुराधा नागवडे यांचा अभ्यास चांगला असून आपला उमेदवार पक्का आहे असे म्हणत त्यांच्या विधानसभा उमेदवारीचे संकेत देतानाच नागवडे दांमपत्याच तोंडभरून कौतुक केल 

या कार्यक्रमासाठी प्रदेश सचीव सचीन गुंजाळ,ज्ञानदेव वाफारे, बाबासाहेब भोस,शुभांगी पोटे,मनोहर पोटे, हेमंत ओगले, स्मितल वाबळे,प्रेमराज भोयटे,राकेश पाचपुते,योगेश भोयटे,ऍड सुनील भोस,भगवान कणसे,विठ्ठल वांळुज,दादासाहेब गव्हाणे,दत्तात्रय चव्हाण,सुधीर जामदार,भाऊसाहेब नेटके,मच्छिंद्र सुपेकर,संदीप औटी उपस्थित होते.


भरपावसात कार्यकर्त्यांनी लुटला सभेचा आनंद:,आ.थोरातांचा कार्यकर्त्यांना हा सल्ला भरपावसात कार्यकर्त्यांनी लुटला सभेचा आनंद:,आ.थोरातांचा कार्यकर्त्यांना हा सल्ला Reviewed by Prashasak on सप्टेंबर ०५, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.